toor dal sakal
छत्रपती संभाजीनगर

नाफेड तूर खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

ऑनलाइन नोंदणी केली मात्र खरेदी केंद्रावर तूरच नाही आणली

सकाळ वृत्तसेवा

जालना : उडीद, मूग, सोयाबीन खरेदीविना नाफेडला खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली. त्यानंतर आता नाफेडने सहा हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र, खुल्या बाजारात तुरीला हमीभावाप्रमाणे भाव मिळत असल्याने या तूर खरेदी केंद्रांकडे शेतकरी फिरकण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी नाफेडकडे तुरीची विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, खरेदी केंद्रांवर तूरच आणली नाही.जिल्ह्यात दरवर्षी नाफेडकडून उडीद, मूग, सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू केले जातात. त्यानुसार यंदा नाफेडने उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उडीद, मूग पिकांना फटका बसला.

उत्पन्नात घट झाल्याने यंदा खुल्या बाजार सोयाबीनसह उडीद, मूग या पिकांना हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. त्यामुळे नाफेडने सोयाबीन, उडीद, मूग खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, शेतकरी या केंद्राकडे फिरकले नाहीत. त्यामुळे खरेदी विनाच हे केंद्र नाफेडला बंद करण्याची वेळ आली.

दरम्यान, आता नाफेडने जिल्ह्यात अकरा ठिकाणी तूर खरेदी सुरू केले आहेत. यात नाफेडने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जालना, अंबड, भोकरदन, राजूर, अन्वा, मंठा, जाफराबाद, माहोरा, बदनापूर, परतूर व आष्टी येथे नाफेडचे तूर ऑनलाइन नोंदणी व खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्यासाठी तुरीची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ १४२ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर ऑनलाइन नोंदणी केंद्रावर नोंद केली आहे. मात्र, एकाही शेतकऱ्यांने नाफेडकडे तूर विक्रीसाठी आणलेली नाही.

सध्या खुल्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात तूर विक्री करून अधिकचे चार पैसे तत्काळ शेतकऱ्यांनी मिळत आहे. त्यामुळे नोंदणी केली असली तरी शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर न आणता खुल्या बाजारात तूर विक्री करत आहे.

खुल्या बाजारात ही चांगला भाव

यंदा तुरीला सहा हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सध्या खुल्या बाजार हमीभावापेक्षा तुरीला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडत आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शनिवारी (ता.२२) पांढऱ्या तुरीला सर्वाधिक सहा हजार ५६१ तर सरासरी सहा हजार २४२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला; तसेच लाल तुरीला सर्वाधिक सहा हजार १५० तर सरासरी पाच हजार ८७५ रुपये भाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT