Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

आरोग्य विभागाच्या परीक्षेत तोतयागिरी, पाच जणांना पोलिस कोठडी

अनिल जमधडे

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत तोतयागिरी करणाऱ्‍या पाच जणांना पोलिसांनी रविवारी (ता. २८) अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल, हेडफोन, कॅमेरा, सेल, डिव्हाईस जप्‍त करण्यात आले आहे. मदन धरमसिंग बहुरे (वय २६), त्याचा भाऊ राहुल धरमसिंग बहुरे (वय २४, दोघेही रा. जोडवाडी), फुल बेग गुलाब बेग (वय ३०, रा. किन्होळा, ता. बदनापूर, जि. जालना), रमेश हरिश्चंद्र बमनावत (वय २६, रा. सांजखेडा, ता. पैठण) आणि संतोष माधवराव रगडे (वय २४, रा. पिंपळगाव शेरमुलकी, ता. बदनापूर, जि. जालना) अशी संशयितांची नावे आहेत.

त्यांना गुरुवारपर्यंत (ता. चार) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.गेवराई तांडा येथील धनेश्वरी महाविद्यालयात पोलिसांनी छापा टाकला होता. या केंद्राच्या बाहेर असलेले चारजण केंद्रातील परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना पेपर सोडविण्यासाठी मदत करत होते. अशाच प्रकारे खोकडपुरा येथील गजानन अभ्यासिका येथेही काहीजण परीक्षार्थीला उत्तरे पुरवले जात होते. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT