Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

प्रथेला दिला फाटा, पाच लेकींनी दिला जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा

नातू तेजसने आजोबाला दिला अग्निडाग

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : आजही जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलानेच खांदा देण्याची भारतात प्रथा (Tradition) आहे. मात्र या प्रथेला छेद देणारी घटना मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतील (Aurangabad) बजाजनगरमध्ये आज गुरुवारी (ता.२०) घडली आहे. येथील पाच मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला, तर नातवाने आजोबाला अग्निडाग दिला आहे. येथे पुरुषोत्तम चंदुलाल खंडेलवाल (वय ७२, रा.बजाजनगर) हे पत्नी मीना आणि रेखा, राखी, राणी, आरती व पूजा या मुलींसह बजाजनगरमध्ये कामानिमित्त आले होते. मुलगा नसल्याची खंत त्यांना कधीच जाणवली नाही.(Five Girls Conduct Final Rituals On Their Father In Aurangabad)

त्यांनी मुलींनी पदवीपर्यंत शिकवले. त्यांची लग्न लावून दिली. बुधवारी (ता.१९) सकाळी आठच्या सुमारास पुरुषोत्तम खंडेलवाल फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेले. बराच वेळ झाला तरी ते बाहेर न आल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने मुलीने दरवाजा तोडला. त्यावेळी पुरुषोत्तम खंडेलवाल यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या दुसऱ्या राज्यात असलेल्या दोन्ही मुली आज गुरुवारी आल्या. पाच मुलींनी धार्मिक प्रथेला फाटा देत वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. नातू तेजस याने आजोबांना अग्निडाग दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT