शिऊर (जि. औरंगाबाद) - मुलं म्हणजे आईच्या काळजाचा तुकडाच. त्यामुळेच आई आपल्या मुलाला कायम तळहाताच्या फोडोप्रमाणे जपते. त्याला साधे खरचटले तर तिला वेदना होतात. तिच्याही तो काळजाचा तुकडा होतात. त्याचं वय खेळण्या-बागडण्याचं. झोपाळ्या वाचून झुलण्याचं. पण, नियतीच्या मनात वेगळंच काही होते. एका क्षणात ट्रकच्या रूपात सुसाट वेगाने मृत्यू आला अन् तिच्या काळजाच्या तुकड्याला कायमचाच घेऊन गेला.
झाले असे की, कोपरगाव येथून शिवगाव (पाटी) येथे विटा भरून भरघाव जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत पाचवर्षीय मुलगा ठार झाला. ही दुर्घटना मंगळवारी (ता. १७) दुपारी चारच्या दरम्यान वैजापूर-औरंगाबाद महामार्गावरील वाघाला फाट्यावर (ता. वैजापूर) घडली. ओंकार गणेश जाधव असे मृताचे नाव आहे.
कोपरगाव येथील ट्रक (एमएच-१२, सीटी-२५६८) कोपरगाव येथून विटा भरून शिवगाव (पाटी) येथे जात होता. वाघाला फाट्यावर ओंकार हा त्याच्या आईसह रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी उभा होता. ओंकार रस्ता ओलांडून आपल्या घराच्या दिशेने पळाला. त्यास ट्रकची धडक बसली.
गल्लेबोरगाव - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावजवळ पळसवाडी शिवारात एस्सार पेट्रोलपंपासमोर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास स्कुटीवर औरंगाबादहून कन्नडकडे जात असलेले शिक्षक अशोक त्र्यंबक घोरपडे (वय ४८) यांना पाठीमागून येणाऱ्या धुळे आगाराच्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक घोरपडे हे औरंगाबादहून कन्नडकडे जात होते. कन्नड-औरंगाबाद महामार्गावर गल्लेबोरगावजवळील एस्सार पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून कन्नडकडे निघाले असता औरंगाबादहून धुळ्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. बसने त्यांना काही अंतरावर फरपटत नेले.
हे वाचले का? - बामुच्या कुलसचिवपदी डॉ. जयश्री सुर्यवंशी
या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली, रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ते अंधानेर (ता. कन्नड) येथील शाळेवर कार्यरत होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव, पोलिस कॉन्स्टेबल अमर आळंजकर व पोलिस मित्र शरद दळवी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. खुलताबाद पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून बीट अंमलदार वाल्मीकराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.