Aurangabad City news 
छत्रपती संभाजीनगर

हर्षवर्धन जाधवांची मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागताच दुसऱ्या दिवशी अॅट्रॉसिटीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - विविध कारणांनी चर्चेत असलेले कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची शनिवारी (ता. 29) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. पदभार घेतल्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी रविवारी (ता. एक) रात्री उशिरा औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांनी माहिती दिली की, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची औरंगाबाद शहरात अदालत रोडजवळ जागा आहे. या ठिकाणी जाधव यांच्या कार्यालयाचे काम सुरु आहे. पाडापाडीमुळे झालेल्या मोकळ्या जागेत नितीन दाभाडे (रा. बनेवाडी) नामक एका व्यक्तीने टपरी उभी केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी २९ फेब्रुवारीला दाभाडे नामक त्या व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ केली होती. 

शिवीगाळ व धमकावल्याप्रकरणी दाभाडे नामक व्यक्तीने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा व धमकावल्याचा आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT