crime news latur sakal
छत्रपती संभाजीनगर

Latur News : लुटमारीच्या तयारीतील चौघे गजाआड

सराफा व्यापाऱ्याची पळविणार होते बॅग, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथे सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे हे नाशिकचे आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गंभीर गुन्हा घडण्यापासून रोखला गेला.

येथील पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. याकरिता पोलिसांची पथकेही तयार करण्यात आली आहेत. येथे सोमवारी (ता. चार) जुन्या गूळ मार्केट परिसरातील असलेल्या वाहनाच्या पार्किंग परिसरामध्ये काही अनोळखी व्यक्ती संशयितरित्या फिरत होते, ते सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिस पथकाला मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन संतोष अशोक पटेकर (वय २६), निलेश ऊर्फ भारत ऊर्फ नाना बापू क्षीरसागर (वय २५, दोघे रा.आम्रपालीनगर, कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक) व ज्ञानेश्वर शरद पोतदार (वय ३१, रा. खोरी गल्ली, लातूर) .

आणि अक्षय लक्ष्मण महामुनी (वय २८, रा. पाच नंबर चौक, पंचवटीनगर, लातूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात असलेल्या पिशवीची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये लोखंडी तलवार, एक लोखंडी बतई व एक दातऱ्या असलेला धारदार विळा मिळून आला आहे. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांनी केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार कोळसुरे यांचे फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाच दिवसांपूर्वी रेकी

दररोज काही सराफा व्यापारी सकाळी आपले वाहन पार्किंगमध्ये लावून सोन्याच्या दागिन्याची बॅग दुकानात घेऊन जातात. रात्री ती बॅग घरी नेतात. ही बाब लक्षात घेत अंधाराचा फायदा घेऊन सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याचा कट या चौघांनी केला होता. त्यासाठी लातूर येथील दोघांनी चार ते पाच दिवसापूर्वी त्यांच्या ओळखीच्या नाशिक येथील दोघांना येथे बोलावून घेतले. तीन-चार दिवसापासून पार्किंग परिसराची रेकी केली होती. रात्री एका सराफा व्यापारी सोन्याच्या दागिन्याची बॅग घरी घेऊन जात असताना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून लुटणार होतो, असे संशयितांनी सांगितले. दोन जणांचे देणे असल्याने व कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवंचनेतून,अडचणीमुळे पैसे मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचे संशयितांनी पोलिसांच्या चौकशीत कबूल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi च्या अर्जेंटिना संघाचा भारतीय चाहत्यांना धक्का, केरळ दौऱ्यावर येणारच नाही?

Madhya Pradesh Tourism : इतिहासाचा साक्षीदार आहे हा किल्ला; राणी लक्ष्मीबाईंपासून राजा भोज यांच्याही आहेत पाऊलखुणा

Euthanasia: लॅटिन अमेरिकेतील 'या' देशाने दिली इच्छामरणाला कायदेशीर मान्यता! जाणून घ्या ‘युथनेशिया’ म्हणजे नेमकं काय अन् या कायद्याचे महत्त्व

Mumbai Rain: मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी, हवामान विभागानं काय सांगितलं? जाणून घ्या...

Bihar Election: ५ मुख्यमंत्री, ४ सिनेस्टार अन्...; बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील किती नेते?

SCROLL FOR NEXT