Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Accident | औरंगाबादमध्ये मोठा अपघात; ४ ठार अन् ३ गंभीर जखमी

औरंगाबादमध्ये मोठा अपघात

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना रस्त्यावरील गाढेजवळगाव फाट्यावर एसटी बस-पिकअपचा भीषण अपघात झाला. यात चार जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात आज बुधवारी (ता.२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने पिकअप जालन्याकडून औरंगाबादकडे (Aurangabad) येत होती. गाढेजवळगाव फाट्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली असता जालन्याकडे जाणारी पुणे-कळमनुरी एसटी बससमोर (ST Bus) आली. (Four People Died, Three Serious Injured In Gadhejawalgaon Phata Of Aurangabad)

एसटी चालकाने प्रसंगावधानतेने बस बाजूला घेतली. मात्र पिकअप बसवर आदळल्याने चार जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांचा आकडा वाढू शकतो असे सांगितले जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT