Cyber Thief
Cyber Thief 
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : पंचतारांकित हॉटेलची बनवली ड्यूप्लिकेट वेबसाइट, सायबर भामटे करतायत मोठी फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : पंचतारांकित हॉटेलच्या नावाने बनावट वेबसाइट खरी असल्याचे भासवून त्यावर ग्राहकांच्या बुकिंग घेत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन ग्राहकांची ३८ हजार ९७९ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले.

तक्रारदार प्रदीप सुरेश माहेश्वरी हे ॲम्बेसिडर हॉटेलचे जनरल मॅनेजर आहेत. ८ एप्रिल रोजी राहुल रामटेके यांनी हॉटेलमध्ये ऑनलाइन रूम बुक केली. त्यानंतर ते ठरलेल्या दिवशी हॉटेलमध्ये आले. तेथे त्यांनी हॉटेलमध्ये ऑनलाइन रूम बुक करून बँक खात्यातून अगोदर ५ हजार ६८० आणि नंतर २९ हजार २३६ रुपये भरल्याचे सांगितले. तेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी www.ambassadorindia.com या वेबसाइटवर जाऊन त्यांच्या नावाने रूम बुक आहे का, हे तपासले. त्यात राहुल रामटेके नावाने रूम बुक नसल्याचे आढळले.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रामटेके यांना तशी माहिती देत आपण कोणत्या वेबसाइटवर रूम बुक केली, याची माहिती विचारली. तेव्हा रामटेके यांनी ambassadorajantahotels.on.drv.tw या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करून रक्कम भरल्याचे सांगितले. दरम्यान, २३ एप्रिल रोजी एस. ई. ए. हाश्मी हे ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आले. त्यांनीही ऑनलाइन बुकिंग करून चार हजार ६३ रुपये भरल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या नावानेही हॉटेलमध्ये रूम बुक नसल्याचे आढळले.

त्यानंतर सायबर भामट्याने ॲम्बेसिडर हॉटेलच्या नावाने मिळती-जुळती वेबसाइट बनवून ग्राहकांची बुकिंग घेत फसवणूक सुरू केल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रदीप माहेश्वरी यांच्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT