Murder  sakal
छत्रपती संभाजीनगर

जालना : फळविक्री करणाऱ्या तरुणाचा खून; चाकून भोसकले

मयताच्या छातीवर व पोटावर भोकसल्याच्या जखम असल्याने...

उमेश वाघमारे

जालना : शहरातील डबल जीन येथे एक तरुणांचा खून(Murder) झाल्याची घटना गुरुवारी (ता.१३) सकाळी उघडकीस आली. भरत अशोक मुजमुले (वय २५, रा.मोरंडी मोहल्ला,जालना) असे या मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाला चाकूने भोकसून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शहरातील डबल जीन येथील एका पडीक जागेवर गुरुवारी (ता.१३) सकाळी एका तरुणांचा मृतयदेह आढळून आला. मयताच्या छातीवर व पोटावर भोकसल्याच्या जखम असल्याने त्यानंतर येथील सजग नागरिकांनी कदीम जालना पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस ठाण्याचा दूरध्वनी लागला नाही, असे नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती काही नागरिकांनी अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी दिली. मात्र, तोपर्यंत घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली आहे.

या गर्दीतील काही नागरिकांनी मृतदेह ओळखल्याने मयत तरुणाचे नाव भरत अशोक मुजमुले असल्याचे पुढे आले. तसेच शहरातील गांधी चमन येथे तो फळविक्री करत होते अशी माहिती पुढे आली. दरम्यान तब्बल दीड ते दोन तासांचा अवधी लोतल्यानंतर कदीम पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक देवीदास सोणवळे व कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले व कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभाग पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी ही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरात सीसीटीव्ही फुटेज ही तपासले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT