Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

भावी नगरसेवकांच्या सोशलमीडीयावर उड्या

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (ता.तीन) जाहीर झाली आणि भावी नगरसेवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मते मागायला सुरवात केली. आजपासूनच आम्ही तुमच्या सेवेत, अशा स्वरुपाचे मॅसेज पाठवायला देखील सुरवात केली आहे. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात वॉर्डांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती, विरोधीपक्षनेता यांच्यासह आजी- माजी पदाधिकाऱ्यांना फटका बसला. यामुळे त्या - त्या वॉर्डातील इच्छुक, भावी नगरसेवकांनी आनंद व्यक्‍त केला. तसेच गुडघ्याला बांशीग बांधून तयार असलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाल्याने आता पाच वर्ष वाट पाहावी लागणार.

दुसरीकडे किमान आपल्यासाठी वॉर्ड आरक्षीत झाला, हे जाहीर होताच काही ठिकाणी तर इच्छुकांनी जल्लोष केला. अनेक दिवसांपासून स्वप्न बाळगून असलेल्या असलेल्या भावी नगरसेवकांनी आम्ही करू आपल्या वॉर्डाचा विकास, आपला वॉर्ड सुजलाम सुफलाम करण्याची आम्हाला द्या संधी, अशा प्रकारचे मॅसेज सोशल मिडीयावर फिरवायला सुरवात केली आहे.

खऱ्या अर्थाने आत्तापासूनच अनेकजण तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनी वॉर्डाची, शहराची कशी वाट लावली, अशा प्रकारचे आरोप करण्यासही सुरवात झाली आहे. शहरातील, कचरा, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न संबधित राज्यकर्त्यांनी एवढ्या वर्षात का सोडले नाही, अशा प्रकारची टिकाही सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने येत्या काही दिवसात सोशल मिडीयावर टिका, आरोप, प्रत्यारोप पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT