Gajanan Maharaj Prakat Din  sakal
छत्रपती संभाजीनगर

Gajanan Maharaj Prakat Din : ‘गण गण गणात बोते’चा घुमला गजर ; संत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा उत्साहात

‘समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय’ असा जयघोष करत व ‘गण गण गणात बोते’चे नामस्मरणाने गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिराचा परिसर भक्तिभावात लीन झाला. दिवसभरात हजारो भक्तांनी संतश्रेष्ठ शेगावीचा योगीराणा गजानन माऊलींचे दर्शन घेतले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय’ असा जयघोष करत व ‘गण गण गणात बोते’चे नामस्मरणाने गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिराचा परिसर भक्तिभावात लीन झाला. दिवसभरात हजारो भक्तांनी संतश्रेष्ठ शेगावीचा योगीराणा गजानन माऊलींचे दर्शन घेतले. प्रकट दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी, कार्यक्रम, गणेशयाग, सदगुरुंचे नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला.

पहाटे चारला श्री महाराजांच्या मूर्तीला अमृताभिषेक करून पूजन करण्यात आले. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला ब्रह्मवृंदांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. गणेश यागाची सकाळी ११ वाजता पुर्णाहुती झाली.

दर्शनबारीत पाच रांगा

यंदा प्रकट दिनी रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर गर्दी हळू हळू वाढत गेली. भक्तांना शिस्तीत आणि मोकळेपणाने दर्शन घेता यावे यासाठी ३५० फूट लांबीचा मंडप टाकून दर्शनबारी तयार केली होती. यात पाच रांगांमधून भक्त गण ‘गण गणात बोते’ नामस्मरण करत महाराजांनी दाखवलेल्या शिस्तीच्या शिकवणीचे पालन करत दर्शन घेतले.

आज काल्याचे कीर्तन

प्रकट दिन महोत्सवात पहिल्या दिवसापासून पोपट महाराज फरकाडे व गायक, वादकांनी दररोज सायंकाळी गाथा भजन व हरिपाठ सेवा दिली. रविवारी (ता.तीन) सायंकाळी सात वाजता संदीपान महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. सोमवारी (ता.चार) जयंत महाराज बोधले यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होईल.

  • चुन भाकरी (भाकरी व बेसन) चा नैवद्य दाखवून प्रसादस्वरुपात वाटप.

  • १८ क्विंटल बुंदीच्या प्रसादाचे सोळा हजार पाकीटे तयार करुन वाटली.

  • १० क्विंटल मसले भाताचा प्रसादही भक्तांना वाटण्यात आला.

  • चप्पल स्टॅंड, दर्शनबारी, प्रसादवाटप, ५०० सेवेकऱ्यांनी सेवा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT