छत्रपती संभाजीनगर

लोकवर्गणी जमा करणार आहात मग हे वाचा

शेखलाल शेख


 औरंगाबादः जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव साजरा करण्यासाठी इच्छुक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमाकरीता लोक वर्गणी (देणगी) जमा करावयाची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधकनकारक आहे.

संबंधितांनी जिल्ह्याच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत ऑनलाईन किंवा ऑफलाईन (प्रत्यक्ष कार्यालयात) येऊन परवानगी घ्यावी असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त म. स. बुधवंत यांनी कळविले आहे. सन २०२० साठी परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. ही परवानगी २२ ऑगस्ट २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून देण्यात येणार आहे. 

ऑनलाईन परवानगी करिता धर्मादाय आयुक्त विभागाचे www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मंडळाची नोंदणी करुन मिळविता येऊ शकते. संकेत स्थळावर प्रणाली मार्गदर्शक या सदराखाली कलम ४१ (क) ची परवानगीवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची माहिती पाहिल्यास पीपीटी फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहे. सर्व इच्छुक मंडळांनी आपआपल्या सोईप्रमाणे ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज लवकरात लवकर करावे व ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी.

ज्या संस्था, संस्था नोंदणी अधिनियक १८६० किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियक १९५० अन्वये नोंदविण्यात आलेल्या असतील व त्यांचे उद्देशात गणेश उत्सव साजरा करणे हा असेल त्यांनी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. 

मागील वर्षीचा हिशोब सादर करणे आवश्‍यक 

ज्या मंडळांनी मागील वर्षी परवानगी घेतली असेल व उत्सव साजरा केला असेल त्यांनी मागील वर्षीचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे नवीन मंडळांनी अर्ज करतेवेळी त्या क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ज्या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्याची अनुमती असल्याचे पत्र व जागा मालकाची ना-हरकत जोडणे बंधनकारक आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT