बीड : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासह शहरांतर्गत रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना रोजच कसरत करावी लागते. आता विसर्जनावेळी बाप्पांनाही खड्ड्यातून मार्ग काढावा लागणार आहे.
धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शहरातून जाणाऱ्या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. यातील डांबरीकरणाचे काम मुदतीत व वेगात पूर्ण झाले. मात्र, राष्ट्रवादी भवन ते इकडे काकू नाना हॉस्पिटल या टप्प्याचे सिमेंटीकरण रस्त्याचे काम अगदीच संथगतीने झाले. त्यात आता दुभाजकाचे काम अर्धवट असून नाल्यांचे कामही अपूर्ण आहे. त्यामुळे हा रस्ता देखील चिखलमय झाला आहे. शहरातून जाणारा दुसरा अहमदनगर - बीड या राज्यमार्गाची देखील पुरती दुरवस्था झाली आहे.
अगदी शहराच्या हद्दीतील रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, जायकवाडी प्रकल्प, जिल्हा न्यायालयासह इतर शासकीय कार्यालये आहेत. मात्र, कार्यालयात येणाऱ्यांसह शहरातील नागरिकांची खड्ड्यांमुळे मोठी कसरत होते.
बाप्पांच्या वाटेतही खड्ड्यांचे विघ्न
शहरातील बोटावर मोजण्याइतकडे रस्ते सोडले तर बहुतांश रस्ते चिखलमय आणि खड्डेयम आहेत. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात तयार केलेल्या डांबरी व सिमेंट रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला एकही डांबरी रस्ता मुदतीएवढा टिकलेला नाही. शहराच्या हद्दीतून जाणारा पांगरी रोडवरील खड्ड्यांमुळे बीडकरांसह गेवराई व बीड तालुक्यातील गावांतून शहरात येणाऱ्या नागरिकांच्या नाकी नऊ येत आहेत.
आता त्यात या रस्त्याच्या कडेच्या नालीच्या बांधकामासाठी माती पडल्याने आता हा खड्डे आणि चिखलमार्ग झाला आहे. काही वर्षांपूर्वी तयार केलेल्या मोंढा रोडचीही अशीच दुरवस्था झाली आहे. नगर रोडही पूर्ण खड्डेमयच आहे. जुना मोंढा, कारंजा रोडचीही अशीच दैना आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रमुख रहदारीचे रस्ते आहेत. बीडकरांना रोज या रस्त्यावरून कसरत करावी लागते. आता गणरायालाही जाताना खड्ड्यांचे विघ्न पार करुन जावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.