crime news
crime news crime news
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime: औरंगाबादेत गॅंगवारमधून तरुणाचा खून

सुषेन जाधव

पुंडलिकनगर पोलिसांनी महिलेसह ५ जणांना ठोकल्या बेड्या

औरंगाबाद: मित्राचा इतर मुलाशी झालेल्या वादातून दोन दिवसानंतर रस्त्यात अडवून लोखंडी गजाने मारहाण करुन चाकूने वार करत खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना रविवारी (ता.८) रात्री साडेनऊच्या सुमारास हनुमाननगर गल्ली क्रमांक दोन येथे घडली. आकाश रुपचंद राजपूत (२१, रा. अजिंक्यनगर, गारखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका महिलेसह चौघे संशयित आरोपी अशा पाचजणांना अटक केली आहे.

या प्रकरणी मृत आकाशचा मोठा भाऊ प्रविण राजपूत (२२) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाशचा मित्र सागर राऊत (वय २४) याचा दोन दिवसापूर्वी हुसेन कॉलनी येथे गणेश तनपुरे याच्यासोबत वाद झाला होता. दरम्यान रविवारी (ता.८) रात्रीच्या वेळेस आकाश आणि त्याचा मित्र सागर राऊत हे दोघेजण हनुमाननगरातील गल्ली क्रमांक २ मधून पायी जात होते. दरम्यान गणेश रविंद्र तनपुरे (१९) त्याचा भाऊ ऋषीकेश तनपुरे (२१) त्याचे नातेवाईक संदीप त्रिंबक जाधव (४५), राहूल युवराज पवार (२४), व गणेशची आई मंगल रविंद्र तनपुरे (४०) अशा पाचजणांनी आकाश आणि सागरला अडविले आणि शिवीगाळ केली, दरम्यान सागर हा पळून गेला. त्याचवेळी गणेश तनपुरे याने आकाशवर चाकूने वार केला, तर ऋषीकेशने लोखंडी गजाने आकाशवर हल्ला चढविला. याचवेळी संदीप जाधव, राहूल पवार या दोघांनी लाकडी दाड्यांने आकाशला मारहाण केली, तर गणेशची आई मंगल तनपुरे हिने आकाशला दगडाने मारले.

मृत्यूपूर्व जबाब ठरला महत्त्वाचा

या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे जमादार बाळाराम चौरे, सुखदेव कावरे आणि पोलीस मित्र अक्षय दाभाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच आकाशचा भाऊ प्रविण राजपूत यालाही कळविले. प्रविण आणि आई यांनीही लगोलग घटनास्थळ गाठले असता पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या आकाशला पोलिस व्हॅनमध्ये टाकले, प्रविण आणि त्याची आई आकाशला बोलण्याचा प्रयत्न करत असताना आकाशने आपणास सदर आरोपींनी कशाप्रकारे मारहाण केली, त्याबद्दल आपबीती सांगितली. हे सांगताना पोलिसांनी मोबाईलमध्येही रेकॉर्डिंग केले. घाटीच्या दिशेने जात असताना आकाश प्रचंड विव्हळत होता. त्याने आपल्याला अख्ख्या तनपुरे कुटुंबियांनी मारहाण केली. साहेब त्यांना सोडू नका, असे म्हणत होता. आकाशला घाटीत दाखल करण्यात आले असता, सोमवारी (ता.९) पहाटे साडेपाच वाजता आकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

साधारण कुटूंबाने गमावला जीव

मृत आकाशच्या कुटूंबात आकाशचे आईवडिल, भाऊ, वहिनी असे सदस्य आहेत. आकाशचे वडील हे सुरक्षारक्षक आहेत, तर त्याचा भाऊ प्रविण हा पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

मारहाणीनंतर बेशुद्ध पडलेल्या आकाशच्या तोंडात माती भरुन त्यावर लघूशंका केल्याचा व्हिडीओ काढल्याची माहिती कानावर आली आहे, मात्र प्रत्यक्षदर्शी आणि सुत्रांकडून असे काही कळले नाही. जे पुरावे सापडतील ते कोर्टात सादर करण्यात येतील.

- घनश्याम सोनवणे, प्रभारी पोलिस निरीक्षक, पुंडलिकनगर ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT