Gautala Sanctuary Three leopards found at different places
Gautala Sanctuary Three leopards found at different places sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : गौताळ्यात तीन बिबट्यांचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : येथील गौताळा अभयारण्यात सोमवारी प्राणी गणना हाती घेण्यात आली असता विविध ठिकाणी तीन बिबट्यांचे दर्शन झाले असून पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात पाणवठ्यांवर वन्यजिवांची रेलचेल दिसून आली. गौताळ्यातील पाटणा, सायगव्हाण परिसरात तीन बिबटे आढळल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना करण्यात येते. सोमवारी गौताळा अभयारण्यात वन्यप्राणी प्रगणना करण्यात आली. कन्नड परिक्षेत्रात तेरा, नागद येथे नऊ, चाळीसगाव येथील सहा पाणवठ्यांवर मचानावर ही प्रगणना करण्यात आली. यात या प्रगणनेत तब्बल ६२ वन्यप्रेमींनी सहभाग नोंदवला. सात वनपाल, २७ वनरक्षक, २४ वनमजूर अशा सुमारे शंभर प्रगणकांनी वन्यजीवांचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक राहुल शेळके, आशा चव्हाण, सागर ढोले आदिंनी या मोहिमेला मार्गदर्शन केले.

पाटणा जंगलातील डोंगरी नदीच्या पाणवठ्यांवर रात्री साडे बाराच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. मेहूण पश्चिम पाणवठ्यांवर निरिक्षकांना बिबट्याचे दर्शन झाले. सायगव्हाण पाणस्थळांवर वनरक्षक राम डूकरे यांना रात्री एकच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. सर्व पाणस्थळांवरील वन्यजीवांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नोंदींचे संकलन एकत्र करण्यात येत आहे.

या नोंदीनुसार विविध ठिकाणी लांडगा, ससे, रानडुक्कर, निलगायी, रानमांजर, सायळ, रातवा पक्षी, रक्त लोचन, इंडियन थिक खेर, राखी धनेश, मोर, भेकर, वानरे आदी वन्य प्राणी अशा एकूण ३८० पशु, पक्ष्यांच्या नोंद झाल्या, अशी माहिती सहाय्यक वन्यजीव. संरक्षक राहुल शेळके यांनी दिली. नागद, चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील माहिती संकलित करून सर्व वन्यजिवांची एकत्रित आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येईल असेही शेळके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT