Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

मोकारं फिरणाऱ्यांना काढायला लावल्या ऊठबशा 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : जमावबंदी व संचारबंदी लागू असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी ऊठबशा काढायला लावल्या. हा प्रकार शुक्रवारी (ता. २४) दुपारी शहागंज परिसरातील चेलीपुरा चौकात घडला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जमावबंदी व संचारबंदी आहे. असे असतानाही सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच्या काळात अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे रोज आढळून येत आहे.

पोलिसांनी वारंवार आवाहन करूनसुद्धा नागरिक ऐकत नसल्याने, शुक्रवारी पोलिसांनी चेलीपुरा चौकात विनाकारण फिरणाऱ्या आठ ते दहाजणांना अडविले. अडविलेल्यांची चौकशी केली असता सर्वच जण उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी व राज्य राखीव दलाच्या जवानांनी सर्वांनाच ऊठबशा काढायला लावल्या. त्यानंतर परत रस्त्यावर फिरणार नाही, अशी हमीही पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून घेतली. 

नशेच्या गोळ्या विकणाऱ्यास अटक 
नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सिटी चौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी (ता. २४) दुपारी शहागंज परिसरातील चेलीपुरा येथे करण्यात आली. शेख अतीक शेख अब्दुल्ला (वय ४२, रा. खत्री दवाखान्याजवळ, चेलीपुरा) असे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याचे नाव आहे. 

चेलीपुरा भागात एकजण नशेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती. सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज आदींच्या पथकाने चेलीपुरा चौकात सापळा रचून शेख अतीक याला ताब्यात घेतले. पोलिसांनी शेख अतीक याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून ४ हजार ७७० रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्यांच्या ८० स्ट्रीप्स मिळून आल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT