crime pune esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime: एकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, दुसरीशीच लग्न केलं; तरूणीची इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या

त्याने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगत प्रेमाचे नाटक केले

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : घाटी रूग्णालयात काम करताना प्रेमाचे नाटक करत नर्स तरूणीला धोका देत ब्रदरने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. या घटनेमुळे तणावात असतानाच अपघात विभागात स्वाक्षरी करताना, त्याच ब्रदरने पुन्हा तिचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्याने नर्स तरूणीने घरात इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.

ज्ञानेश्वर पवार असे आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संशयित ब्रदरचे नाव आहे. या प्रकरणी मृत नर्सच्या आईने तक्रार दिली. त्यांची मुलगी घाटी रूग्णालयात २०१६ पासून अधिपरिचारीका म्हणून काम करत होती.

१ मेरोजी रात्री सदर नर्सने घराच्या बाथरुमध्ये स्वत:च्या हाताला इंजेक्शन टोचून घेतले. तिला बेशुद्धावस्थेत घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. सदर नर्सच्या सोबत काम करणारा ज्ञानेश्वर पवार हा नेहमीच घरी येत होता.

तसेच त्याने प्रेमाचे नाटक केले, तीच्याशी लग्न करण्याचे सांगत, जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. असे असतानाच त्याने सदर नर्ससोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. तसेच २४ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर पवार याने मस्टरवर सह्या करताना सदर नर्सचा सर्वांच्या उपस्थितीत अपमान केला.

या अपमानामुळे मानसिक तणावात आलेल्या सदर नर्सने आत्महत्या केली. या प्रकरणी ज्ञानेश्वर पवार याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक श्री. आढाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT