Crime News
Crime News  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : प्रेमापायी 'ती'ने सोडलं घर! मनोरुग्ण आईला सोडून बुरखा घालून दोघांचा आसामला जाण्याचा प्लॅन; पण...

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : तीचे वय केवळ १४ वर्षे. घरात पुजारी वडील तर आई मनोरुग्ण असल्याने मामाच्या घरी राहते. कमी वयातच तिला वाईट संगत लागल्याने ती केव्हाही घराच्या बाहेर पडते, कधी येते कधी जाते. मात्र गुरुवारी (ता.१८) तीने चक्क कायमचेच घराबाहेर जाण्याचा निश्चय केला अन् एक मुलाचा बाप असलेल्या प्रियकरासह आसामला जाण्याचा ‘प्लॅन’ आखला.

विशेष म्हणजे लहान वाटू नये, कोणाला ओळखू येऊ नये म्हणून त्याने तीला बुरखा घालून पळून जाण्याचे ठरविले होते. इतकेच नव्हे, तर तीने घरुन दहा हजार रोख, आईचे दीड-दोन तोळे दागिने सोबत आणलेले होते. मात्र ‘तो’ येण्याआधीच ‘दामिनी’ने तिला रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

यासंदर्भात दामिनी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकावरील फेरीवाल्या तरुणाला एक अल्पवयीन मुलगी संशयितरित्या दिसली. त्याने तत्काळ ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांकडून शहर पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. नंतर दामिनीने धाव घेत तिला ताब्यात घेतले. दरम्यान तीने मद्यप्राशन केल्याचे समोर आले. ती खूप हट्टी असून कोणाचेच ऐकत नाही, दिवसभर मुलांसोबतच फिरते, घराबाहेर गेली की एक दोन दिवस घरी येत नसल्याची हतबलता वडीलांनी पोलिसांसमोर बोलून दाखविली.

काय आहे नेमकी घटना?

वडीलांनी अनेकवेळा सांगूनही तिच्या वागण्यात काही फरक पडला नाही. अशातच शाळेत तिच्या काही मित्रांच्या माध्यमातून तिच्यापेक्षा मोठ्या मुलांच्या ओळखी झाल्या. यातून एकाने तिला भुलविले. यातून सोबत पळून जाण्याचा त्यांनी प्लॅन आखला होता. सुरवातीला शहरातून आसामला जाऊन, तिथून उत्तरप्रदेशला जाण्याचे त्यांनी नियोजन केले होते.

आता तीच्यासह वडीलांचे समूपदेशन करण्यात आले. इतके होऊनही मुलीने वडिलांसोबत घरी न जाण्याचा पवित्रा घेतल्याने अखेर तिला दामिनीने बालकल्याण समितीसमोर हजर केले असता, तिला सध्या एका बालगृहात ठेवण्यात आले आहे.

तर तीने घरुन चोरुन आणलेल्या वस्तू तिच्या वडीलांना सुपूर्द करण्यात आल्या. ही कारवाई रेल्वेच्या सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी यांच्यासह दामिनीच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता फासाटे, सहायक फौजदार लता जाधव, कल्पना खरात, सुभाष मानकर, गिरीजा आंधळे, अंबिका दारुंटे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT