सोयगाव (जि.औरंगाबाद) : शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला हर्षवर्धन जाधव यांनी निवेदन दिले. 
छत्रपती संभाजीनगर

मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचा इंगा दाखवू, हर्षवर्धन जाधवांचा इशारा

ईश्वर इंगळे

सोयगाव (जि.औरंगाबाद) : केंद्र आणि राज्याच्या सत्तेतील दोन मंत्री लाभलेल्या सोयगाव (Soygaon) तालुक्यात अतिवृष्टीची दाहकता गंभीर आहे. या अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळीपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरात मदत न मिळाल्यास सत्तेवर असलेल्यांना शेतकऱ्यांचा इंगा दाखवीत सळो कि पळो करणार असल्याचा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshwardhan Jadhav) यांनी बुधवारी (ता.२२) दिला. यावेळी अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम देवून राज्य सरकारला थेट चेतावणी दिली आहे. अतिवृष्टीच्या बाधित क्षेत्राचे १३ मे २०१५ आणि २५ जानेवारी २०१८ प्रमाणे काढण्यात आलेली राज्य आणि केंद्र शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. मागील वर्षीच्या रखडलेल्या पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि या वर्षीही पिकविमा मंजूर व्हावा या मागण्यांसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट सोयगाव तहसील कार्यालयावर (Aurangabad) आसूड आणि रुमणे मोर्चा काढला होता.

या मोर्चाला तालुका कृषी कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. थेट तहसील कार्यालयावर या मोर्चाला समारोप करण्यात आला. यावेळी समारोप करतांना जाधव यांनी राज्य शासनाला थेट मदतीचा अल्टीमेटम देत दिवाळीपर्यंत मदत देण्याची आग्रही मागणी या मोर्चाद्वारे केली आहे. सोयगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे जाधव यांनी राज्य आणि केंद्र शासनावर चौफेर टीका करत सोयगाव तालुक्याला केंद्र आणि राज्य शासनाचे दोन मंत्री लाभलेले आहे. परंतु तरीही या तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर आहे असेही त्यांनी सांगितले.

तासभर मोर्चेकरी उन्हात तापले

सोयगाव तहसील कार्यालयावर आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार मोर्चेकरी शेतकऱ्यांजवळ न आल्याने तासभर उन्हात तापलेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाल्याने अखेरीस पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी मध्यस्थी केल्याने नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

प्रकृतीत अचानक बिघाड

माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांच्या मोर्चात प्रकृतीमुळे अस्वस्थ झाल्याने मोठी धावपळ उडाली होती अखेरीस त्यांना सोयगावचं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.शेतकऱ्यांच्या मोर्चात उन्हात तापलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अचानक प्रकृती खालवली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यावेळी मोर्चात ज्ञानेश्वर युवरे, मुरलीधर वेहळे, खेमराज जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विजयसिंग सोळंके, प्रेमसिंग शिंदे, सावकार महाजन, ईश्र्वर सपकाळ, दिनेश जाधव, आप्पा वाघ, संजय पाटील, छोटु रामकोर, चेतन पाटील, ऋषी सोनवणे, आबा जाधव, शिवाजी पवार, बंडू पाटील, नगराज पाटील, युवराज जाधव, समाधान चोपडे, अमोल शेळके, डिगंबर जाधव, प्रभु तायडे, ज्ञानेश्वर पाटील, अमोल माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT