Atul Save 
छत्रपती संभाजीनगर

शंभर कोटीतील रस्त्यांचा द्या अहवाल, आमदार सावेंच्या तक्रारीची दखल

माधव इतबारे

औरंगाबाद : शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेने ३१ रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र ही कामे निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपचे आमदार अतुल सावे यांनी शासनाकडे केली आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने रस्त्यांसंदर्भात सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता.

त्यातून ३१ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र सुरवातीस कोणती रस्ते यादीत घ्यायची यावरून शिवसेना व भाजपमध्ये वाद लागला. त्यानंतर निविदा प्रक्रियेवरून कंत्राटदारांमध्ये वाद लागला. त्यामुळे तब्बल दोन वर्षे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नव्हती. अजूनही या निधीतील काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान शंभर कोटीतील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची तक्रार भाजपचे आमदार अतुल सावे यांनी शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने महापालिकेला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi attacks Modi : 'मेट्रो, इंटरनेट, रस्ते बंद केले... पण पेपरफुटी थांबवू शकला नाहीत'; राहुल गांधींनी मोदी सरकारला पुन्हा डिवचलं

मर्यादित सेवा द्या! दिल्लीत फूड डिलिव्हरी, कॅब सेवेवर निर्बंध; पोलिसांच्या आदेशानं संताप, ही तर फूडबंदी

Live Updates Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा, भक्ती आणि सेवाभावाचा दिला संदेश

ITR Rule: पगारातून TDS कापला जातोय? तरी ITR भरावा लागेल का? जाणून घ्या आयकर विभागाचे नियम

महायुद्ध सुरू ? इराण -अमेरिका संघर्षात दोन देशांची उडी... बहरीन अन् कुवेतचा इराणवर थेट हल्ला! जगावर मोठं संकट

SCROLL FOR NEXT