Hair Salons set to Open for Business 
छत्रपती संभाजीनगर

कात्री कायम : सलून, ब्यूटी पार्लर सुरू झाले की या अटी पाळाव्याच लागणार

माधव इतबारे

औरंगाबाद  : लॉकडाउनमुळे सलून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली. तब्बल दोन महिन्यांपासून केस कापले नसल्यामुळे व दाढी केली नसल्याने अनेक जण ओळखायला येत नसल्याचे चित्र आहे. त्यावर सोशल मीडियावर अनेक विनोदही झाले. आता शासनाने लॉकडाउनमधून शिथिलता देत आहेत. त्यामुळे सलून, ब्युटीपार्लर सुरू करण्यास परवानगी दिली जाईल का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरी शासनाने परवानगी दिली तरी शासन काही अटी टाकू शकते. त्या अटी पाळाव्याच लागतील. शिवाय सलून सुरू होणार आहेत, असे मेसेजही व्हायरल होत आहेत. जेव्हा केव्हा निर्णय होईल तेव्हा अटी शर्ती असणारच आहेत. 

कोरोना विषाणूमुळे दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यात काही काळासाठी जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यास मुभा असली मात्र इतर आस्थापना बंद आहेत. विशेषतः सलून बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाउनचा चौथ्या टप्पा काही प्रमाणात शिथिल केला आहे. त्यानंतर आता सलून व ब्यूटीपार्लर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी काही जिल्ह्यांमधून होत आहे. सलून बंद असल्याने या व्यवसायावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष शासनाच्या आदेशाकडे लागले आहेत.  

जरी परवानगी दिली तरी या असतील अटी

  • सलून किंवा ब्यूटीपार्लर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. 

  • परवानाधारक किंवा अधिकृत व्यावसायिकांनाच हा व्यवसाय करता येईल. 

  • अपॉन्टमेंट घेऊन आलेल्या ग्राहकांनाच सेवा देण्यात यावी. 

  • केवळ हेअर कट, हेअर ड्राय, व्हॅक्सीन, थ्रेडिंग याच सेवांना परवानगी देण्यात आली आहे. दाढी, फेशियल, ब्लिचिंग व त्वचेच्या संबंधित अन्य सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. 

  • सलूनमध्ये असलेल्या खुर्च्यांच्या पन्नास टक्के व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. 

  • प्रत्येक सलून, ब्युटीपार्लर चालकाने इन्फ्रा रेड थर्मामीटरच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाची तपासणी करणे बंधनकारक असेल. 

  • एखादा व्यक्ती कोरोना संशयित आले असे वाटले तर त्याला प्रवेश देण्यात येऊ नये. 

  • ग्राहक व सलून चालक या दोघांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. 

  • हँडसॅनीटायजर सलून किंवा ब्युटीपार्लर प्रवेशद्वारावर उपलब्ध करून द्यावे. 

  • सलूनमधील सगळ्या खुर्च्यांचे सोडियम हायड्रोक्लोरीटने प्रत्येक ग्राहकानंतर निर्जंतुकीकरण करावे. 

  • प्रत्येक ग्राहकासाठी डिस्पोजेबल टॉवेल, न्यापकीन वापरावा 

  • जे साहित्य डिस्पोज करता येणार नाही ते सॅनिटाईज करून, निर्जंतुकीकरण करून वापरावे. 

  • सलूनचा परिसर (ग्राहकांना बसण्याची जागा, पायऱ्या, व्हरांडा) दिवसांतून पाच वेळा सॅनीटाइज करावा. 

  • फरशी आणि कार्पेट सतत स्वच्छ करावे. 
  • प्रत्येक ग्राहकाला डिस्पोजेबल साहित्य सोबत आणण्याची व परत नेण्याची मुभा असेल (कात्री, कंगवा आदी) किंवा जास्त पैसे देऊन सेवा घेण्याचा त्याच्याकडे पर्याय उपलब्ध असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT