sakal
sakal
छत्रपती संभाजीनगर

वाळूज परिसरात कोसळला जोरदार पाऊस, रस्त्याला नदीचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर: हवामानाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. वाळूज परिसरात ही या पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा तुटला संपर्क. शिवाय रस्ते व गल्लीलाही नदीचे स्वरूप आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी सर्वत्र दानदान उडाली. सोमवारी (ता.27) पासून हस्त नक्षत्राला सुरुवात झाली.

हवामानाचा अंदाजानुसार जिल्ह्यात या नक्षत्राच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस पडला. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारीही जोरदार कोसळत होता. त्यामुळे अनेक ठिकाणच्या नदी नाल्याला पूर आले. वाळूज परिसरात या पावसाने अनेकजण त्रस्त झाले. शेतकरी तर या पावसाने पुरता हवालदिल झाला.

वाळूज येथील आजवानगर, पंढरपूर येथील सलामपुरेनगर, गिरिराज हाऊसिंग सोसायटी, वडगाव (को.) यासह अनेक सखल भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्य भिजले. परिणामी अनेकांना रात्र जागून काढावी लागली शिवाय घरात पाणीच पाणी असल्याने अनेकांना उपवासही सहन करावा लागला.

पंढरपूर वळदगावचा संपर्क तुटला -

वाळूज परिसरासह शहरात जोरदार पाऊस पडल्याने वाळूज परिसरातून वाहणार्‍या खाम नदीला पूर आला. त्यामुळे वाळूज पंढरपूर दरम्यानच्या नळकांडी पुलावरून पाणी वाहत होते. परिणामी पंढरपूर वळदगावचा संपर्क तुटल्याने नागरिक, विद्यार्थी अडकून पडले. शिवाय वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगारांना कामावर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला. दरम्यान घाणेगाव ते नारायणपूरच्या ओढ्याला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता.

वाळुज महामार्गावर पाणीच पाणी -

वाळूज औद्योगिक वसाहतीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने हे पाणी पंढरपूर येथील कामगार चौकात येते. या चौकात महामार्गा खालून पाणी वाहून जाण्यास पूल नसल्याने ते महामार्गावरच साचते. त्यामुळे येथे पाणीचपाणी साचून महामार्ग पाण्याखाली जातो. त्यातून वाट काढताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येतात.

ग्रामपंचायत विरोधात रोष -

पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे शकीला शेख जब्बार, अहेमदखा बिस्मिल्लाखा पठाण, प्रकाश वरदे, नादुबी पठाण, देवा पोलाद जाधव, रामभाऊ, जाधव, बुटा मुखवानी, शफीक पठाण, सुमन बिनीविले, कचुर गायकवाड, अनिल कांबळे, अमरूद मुखवानी यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी ग्रामपंचायत विरोधात खूप रोष व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT