Shivoor Police News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या शिऊर पोलिसांची गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल, बालविवाह रोखल्याने केले कौतूक 

रमेश राऊत

शिऊर (जि.औरंगाबाद) : बालिका दिनाच्या दिवशीच शिऊर पोलिसांनी एक बालविवाह रोखला व दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांचे समुपदेशन केले. शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या टीमने केलेल्या या कारवाईचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक करत शिऊर पोलिसांची प्रशंसा केली आहे.

पालकांनी आपल्या पाल्याचे कायदेशीर वय पूर्ण झाल्यावरच विवाह करण्याचे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे. शिऊर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळताच त्यांनी  विवाहस्थळी सदर मुलीच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून मुलीच्या वयाची खात्री करून बालिका दिनाच्या दिवशीच बालविवाह रोखला.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन शिऊर पोलिसांचे कौतुक केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT