Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना सोडावे लागतेय वसतिगृह

अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. वसतिगृहदेखील बंद ठेवण्यात येणार असून शहरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वसतिगृह, शासकीय वसतीगृह, एमजीएम विद्यापीठ, देवगिरी महाविद्यालय आदी वसतिगृहे रिकामी झाली आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एम.फील, पीएच.डी. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी घरी गेले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सोमवारीच नोटीस दिली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ९० टक्के वसतीगृह खाली झाले असल्याचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

एमजीएम विद्यापीठातील वसतिगृहात एक हजार विद्यार्थी राहतात. यातील मोजके विद्यार्थी वैद्यकिय शाखेचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना येथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे दीडशे विद्यार्थी आहेत, अशी माहिती वसतिगृह अधिक्षक प्रेरणा दळवी यांनी दिली. देवगिरी महाविद्यालयातील बाराशे विद्यार्थी सकाळपासून घरी जात होते. अशी माहिती अधिक्षक लता जाधव यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात सरकारी १९ वसतिगृहे आहे. यात मुलींचे ९ तर, मुलांचे १० वसतिगृहे आहेत. यात सुमारे अडीच हजार विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्ट्या दिल्या असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एस. शेळके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT