Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

फिजीकल डिस्टन्स’न पाळणाऱ्या बिनलाज्यांना सांगायचे कसे?

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : नव्या नियमानुसार सोमवारी (ता.चार) सम तारखेस सकाळी सात ते अकरा हा वेळ जीवनावश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी देण्यात आलेला होता. यासाठी फिजीकल डिसटन्सचे पालन व्हावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, जणु संचारबंदी उठविण्यात आलेली आहे, अशी वेड्यागत गर्दी नागरिकांनी बाजारात केली होती. विशेष म्हणजे यानिमित्ताने फिजीकल डिसटन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावरुनच पोलिस प्रशासन झोपा काढतंय का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. हे संकट रोखण्यासाठी २४ तास संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. केवळ जीवनावश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळात शिथीलता देण्यात आलेली आहे. या नियमांमध्ये अनेकवेळा बदल करण्यात आला. मागील चार दिवसांपासून सम आणि विषमनुसारच शिथीलता देण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार सोमवारी सम तारखेला शिथीलता देण्यात आलेली होती. त्यामुळे लोकांनी सकाळपासुनच दुकानांबाहेर गर्दी करण्यास सुरवात केली होती.

टीव्ही सेंटर, जुने शहर, सहकारनगर, शहानुरमीया दर्गा परिसर, गारखेडा यासह अन्य भागात किराणा, भाजीपाला, धान्यखरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. हे चित्र पाहुन क्षणभर हा होइना संचारबंदी उठली की काय, असा संशय व्यक्त केला जात होता. हे सर्व सुरु असताना पोलीसांची भुमिका बघ्यांची होती. अकरानंतर पोलिसांनी आता दुकाने बंद करा, असे आवाहन करण्यास सुरवात केली. 

अशा गर्दीत कोरोनाबाधीत गेला तर...! 
यापुढे आपल्याला किराणासह अन्य वस्तु मिळणार नाही, अशी भिती लोकांच्या मनात आहे की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. त्यामुळेच खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत आहे. हे सर्व होत असताना फिजीकल डिसटन्सचे नियम धाब्यावर बसविण्यात आहे आहेत. अशा ठिकाणी जर कोरोना बाधीत रुग्णाची एंट्री झाली तर.. काय होईल, अशी भितीही व्यक्त होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT