how to provide digital education to children 1943 schools of Zilla Parishad outstanding electricity bills Sakal
छत्रपती संभाजीनगर

Digital Education : मुलांना डिजिटल शिक्षण द्यायचं कसं? जिल्हा परिषदेच्या तब्बल १९४३ शाळांचे थकले एक कोटीचे वीजबिल

वीज बील थकवल्याप्रकरणी महावितरण विभागाकडून अनेक शाळांचे वीज मीटर काढण्यात आले आहे. वीज नसल्यामुळे शाळेतील डिजिटल साहित्य धूळखात पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या तब्बल १९४३ शाळांचे १ कोटी ८ लाख ९ हजार ३२८ रुपये वीजबील थकीत आहे. वीज बील थकवल्याप्रकरणी महावितरण विभागाकडून अनेक शाळांचे वीज मीटर काढण्यात आले आहे. वीज नसल्यामुळे शाळेतील डिजिटल साहित्य धूळखात पडले आहे.

एकीकडे शाळांना वीज देयकांचा भार न परवडणारा असल्याने शाळा सौर पॅनलवर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार अद्यापपर्यंत निम्म्या शाळांतही सौर पॅनल लागलेले नाहीत. काही पॅनल बंद पडले आहेत.

त्यातच शाळांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने मुख्याध्यापकांनी हात वर केले आहेत. सर्वाधिक वीजपुरवठा खंडित झालेल्या शाळा वैजापूर तालुक्यात आहेत.

शाळा हा विषय व्यवस्थापन समितीच्या अधिकारात येतो. या शाळांत काय स्थिती आहे, याचे कुठलेही देणे-घेणे गावातील लोकप्रतिनीधींना नसल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे २१३० शाळा आहेत. शासनाने शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान पुरवले आहे. बहुतांश शाळा स्मार्ट होत असताना शाळांमध्ये वीजपुरवठा नसेल तर डिजिटल तंत्रज्ञानाचा काय फायदा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुकानिहाय थकीत वीजबिल

तालुका - शाळा - थकीत विजबिल

  • कन्नड - २७३ - १२,८३,६२४

  • खुलताबाद -९२ -४,२२,४४०

  • गंगापूर -२३२- ११,९५,३६०

  • छत्रपती संभाजीनगर -२५२ -२२,४७,८५०

  • पैठण -२४९ -१७,४५,९५०

  • फुलंब्री -१८१ -७,७३,४७५

  • वैजापूर -३१० -१६,९७,६६५

  • सिल्लोड -२६० -९,७०,८८४

  • सोयगाव - ९४ -४,७२,०८०

  • एकूण -१९४३ - १,०८,०९,३२८

शाळांना मिळणारा निधी अत्यल्प

पूर्वी जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्याच्या खर्चासाठी शासनाकडून सानुग्रह अनुदान दिले जात होते. ते कमी करून आता समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी दिला जातो. मात्र, हा निधी चार टप्प्यांत अत्यल्प मिळतो.

या निधीतून शालेय खर्चासह वीजबिलसुद्धा भरावे लागत असल्याने, त्यात महावितरणच्या वाढत्या वीजबिलामुळेही वीज बिले भरणे शाळा प्रशासनाला जड जात आहे. त्यामुळे अनेक शाळांनी यातून मार्ग निघत नसल्याने वीजबिल भरले नसल्याचे ऐकायला मिळते.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी लोकवर्गणी करून जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळा डिजिटल केल्या आहेत. मात्र, आता वीजबिल भरले नसल्यामुळे शाळेतील संगणक, टीव्ही, डिजिटल बोर्ड साहित्य धूळखात पडून आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावयची असेल तर जिल्हा परिषदेने वीजबिल भरण्यासाठी विशेष तरतूद करायला हवी.

— विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून थकीत वीजबिल असलेल्या शाळांची माहिती घेणे सुरू आहे. शाळांचे वीजबिल भरण्यासाठी प्रशासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. लवकरच सर्व शाळांचे वीजबिल भरण्यात येईल.

— जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT