Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta 
छत्रपती संभाजीनगर

अडचणी, सूचना असतील तर थेट संपर्क करा; औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांची नागरिकांना आवाहन

माधव इतबारे

औरंगाबाद : कम्युनिटी पोलिसींग अंतर्गत ‘माझे शहर माझी जबाबदारी' विषयावर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शनिवारी (ता. २४) शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेतली. पोलिस विभागाशी संबंधित अडचणी, सूचना असतील तर नागरीकांनी थेट आपल्याशी संपर्क करावा असे त्यांनी आवाहन केले.


पोलिस आयुक्तालयात शनिवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी अभियान राबवण्यासाठी उपाययोजना, वाहतुकीसंबंधी व सर्वसामान्यांना पोलिस स्टेशनस्तरावर येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे, सामाजिक एकोपा, गुंडागर्दी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, व्यापाऱ्यांचे प्रश्‍न, औद्योगिक आणि सामाजिक विकास आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

नागरिकांनी सुचवलेल्या उपाययोजनांचा अवलंब करून स्वच्छ प्रतिमा असलेल्या नागरिकांचा कम्युनिटी पोलिसिंग मध्ये सहभाग वाढवून कामाचा दर्जा उंचावण्यात येईल असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बनकर, ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरमचे अध्यक्ष जुनैद फारूखी, जसवंतसिंग, खडकसिंग, नागनाथ काळे, राजू महाराज, डॉ. अफजल माजेद, डॉ. अफजल नूर, डॉ. सतीश ढगे, सुषमा शहा, ॲड. सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या पद्धती; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, कसं वापरायचं पाहा?

Latest Marathi Live Updates: SIR कडे दुर्लक्ष करू नका- राज ठाकरे

FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

Operation Tiger: ठाकरेंचे खासदार फोडणारा मास्टरमाईंड कोण? समोर आलं मोठं नाव; थेट दिल्ली कनेक्शन, आधी 'शस्त्र विक्रेता' म्हणूनही चर्चेत

SCROLL FOR NEXT