छत्रपती संभाजीनगर

प्राध्यापकांच्या रिक्त जागांनी संलग्नीकरण होऊ शकते रद्द!

अतुल पाटील

शिक्षकांची, प्राध्यापकांची कमतरता आहे. अनुदानित महाविद्यालयांना शासनाकडून पदे मंजूर होत नाहीत. विनाअनुदानित महाविद्यालयात संस्थाच पदे भरत नाहीत.

औरंगाबाद : महाविद्यालयांची संख्यात्मक वाढ झाली, मात्र गुणात्मक वाढीमध्ये कमी पडत आहे. यापुढे गुणवत्तेत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. तसेच ॲकॅडमिक कौन्सिलची बैठक घेऊन निकष बनविण्यात येणार आहेत. त्या निकषात संस्था बसत नसतील तर, त्यांचे संलग्नीकरण रद्द केले जाणार आहे, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Vice Chancellor Pramod Yeole) यांनी दिला आहे. ‘सकाळ’च्या (Sakal) फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘शिक्षकांची, प्राध्यापकांची कमतरता आहे. अनुदानित महाविद्यालयांना शासनाकडून पदे मंजूर होत नाहीत. विनाअनुदानित महाविद्यालयात संस्थाच पदे भरत नाहीत. याची विद्यापीठानी गंभीर दखल घेतली आहे. (If Professor Posts Vacant Then Affiliation Will Cancells)

ॲकॅडमिक कौन्सिलमध्ये काही निकष बनवतो आहे. याची पूर्तता असल्याशिवाय संलग्नीकरण पुढे कायम ठेवणार नाही. अशी भूमिका घेणार आहोत. शिक्षक नसतील तर गुणवत्ता कशी येणार? जी ठरवेल तेवढी संख्या प्राध्यापकांची असल्याशिवाय त्यांना संलग्नता निरंतर देणार नाही. गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.’’ असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात महाविद्यालयांच्या स्वायत्तता आणि संलग्नता यावर भर दिला आहे. २०२३ पासून संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे. संलग्नता हवी कशाला? असा एक प्रवाह आहे. आपल्या विद्यापीठातही स्वायत्त महाविद्यालयांची संख्या कमी आहे. नॅकचा अ दर्जा असलेल्या १८ महाविद्यालयांची बैठक घेतली. अभ्यासक्रम, परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. यासाठी विद्यापीठावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांनी स्वायत्ततेसाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

‘एमओयू’तून ३० स्टार्टअप

औरंगाबाद इलेक्ट्रिकल्ससोबत (Aurangabad Electricals) झालेल्या एमओयू अंतर्गत विद्यापीठाला दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ‘गर्जे मराठी’सोबत झालेल्या सामंजस्य कराराचा अटल इन्क्युबेशन सेंटरला लाभ होत आहे. याद्वारे ३० स्‍टार्टअप सुरू होत आहेत. त्यासाठी तज्ज्ञ, अर्थसाहाय्याचे आव्हान स्वीकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT