Ipca Laboratories And Aurangabad News
Ipca Laboratories And Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

वाळूजच्या इप्का कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी,'ऑक्सिजन'साठी १० लाखांचा निधी

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील (Waluj MIDC) इप्का लॅबोरेटोरीज या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत कंपनीच्या काॅर्पोरेट इन्व्हायर्मेन्ट रिस्पॉन्सब्लिटीज (सीईआर) फंडाअंतर्गत ऑक्सिजन टँक खरेदीकरिता एमआयडीसी प्रशासनाला दहा लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी एमआयडीसीचे उपअभियंता गणेश मुळीकर, सहायक उपअभियंता अरुण पवार, इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीचे युनिट हेड संजय चोबे, कमर्शियल हेड कमलेश जैन, कंपनीच्या मानव संसाधन आणि प्रशासन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक व्यंकट मैलापूरे आदींची उपस्थिती होती. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोना (Corona) संसर्गाने थैमान घातले आहे. दरम्यान ऑक्सिजनची कमी असल्याने अनेक रुग्णांचा अकाली मृत्यू ओढावला.(Ipca Company Give 10 Lakh To Midc Under Corporate Environment Responsibility Fund For Oxygen Plant In Waluj Of Aurangabad)

कोरोनाचे भय अद्याप संपलेले नसताना पुन्हा कोरोना व ओमिक्राॅन (Omicron) संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणू नये. म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सहकार्यातून वाळूज एमआयडीसीतील इप्का लॅबोरेटोरीज (Ipca Laboratories) या कंपनीच्या काॅर्पोरेट इन्व्हायर्मेन्ट रिस्पॉन्सब्लिटीज फंडाअंतर्गत ऑक्सिजन साठविण्यासाठी ऑक्सिजन टँक खरेदीकरिता एमआयडीसी प्रशासनाला दहा लाखांचा धनादेश शनिवारी (ता.२२) सुपूर्द करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT