Imtiaz Jaleel, Abdul Sattar, Sandipan Bhumre, Pradip Jaiswal, Sanjay Shirsath, Ramesh Bornare esakal
छत्रपती संभाजीनगर

पैसे देतील त्यांच्याकडे ते पळतील, जलीलांची औरंगाबादच्या शिवसेना आमदारांवर टीका

'सर्व पैशाचा धंदा असून जे पैसे देतील त्यांच्याकडे ते लोक पळतील'

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना आज वेग आला आहे. सूरतहून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसह आमदार गुवाहाटीला हलवण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बंडखोरीत औरंगाबादचे (Aurangabad) पाच आमदारांचा समावेश आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Imtiaz Jaleel Attacks On Revolt Shiv Sena MLAs Of Aurangabad)

आमदारांना फक्त पैसे पाहिजे, जे त्यांना पैसे देतील त्यांच्या मागे ते पळतात, अशी टीका त्यांनी औरंगाबादच्या आमदारांवर केला. तुम्हाला मंत्री केले. नंतर तुम्हाला अजून काय पाहिजे होते. त्यामुळे हिंदुत्वाच्या फक्त गप्पा मारल्या जात असल्याची टीका त्यांनी आमदारांवर केली. हा सर्व पैशाचा धंदा असून जे पैसे देतील त्यांच्याकडे ते लोक पळतील, असे इम्तियाज जलील म्हणाले.

मराठवाड्यातील या आमदारांची बंडखोरी

पैठणचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबादचे पश्चिमचे संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे रमेश बोरनारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर यांनी बंडखोर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result live update : पन्हाळा, हातकणंगलेत विनय कोरेंना धक्का देत सतेज पाटलांची एकतर्फी बॅटिंग; महायुतीचे उमेदवार ४० मतांच्या फरकांनी आघाडीवर

Priest Dies Viral Video : चर्चमध्ये प्रार्थना सुरू असतानाच कोसळला भलामोठा क्रूस; दुर्दैवी घटनेत धर्मगुरूंचा मृत्यू, थरारक VIDEO VIRAL

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, सूरत एक्सप्रेसमधून तिघेजण ताब्यात; महत्त्वाची माहिती समोर

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर; 'या' महिन्यात खात्यात येणार पैसे, घरबसल्या असे तपासा स्टेटस

Latest Marathi News Live Update : अरुण डोंगळे प्रचंड मतांनी पिछाडीवर; सतेज पाटील यांच्या 'समविचारी'चे सहा उमेदवार आघाडीवर

SCROLL FOR NEXT