औरंगाबाद - पालकमंत्री सुभाष देसाई यांना एमआयएमच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. सकाळ
छत्रपती संभाजीनगर

'एमआयएम'ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे

मधुकर कांबळे

औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad) आज रविवारी (ता.१५) स्वातंत्र दिनी मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तालयात जात असताना पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई (Guardian Minister Subhash Desai) यांना एमआयएमच्या (MIM) वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले. येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविल्याचा निषेध करण्यासाठी हे झेंडे दाखवण्यात आले. या प्रसंगी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, की कोणाच्या सांगण्यावरुन क्रीडा विद्यापीठ (Sports University) पुण्याला हलवले आहे. पालकमंत्र्यांनी फक्त निवडणुकीसाठी औरंगाबादेत यायचे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फेसबुकवरुन साधला जनतेशी संवाद

आधी युतीच्या काळात औरंगाबादसाठी जाहीर झालेले आयआयएम आणि एम्स हॉस्पीटल नागपूरला पळवले आणि आताच्या सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांनी औरंगाबादला जाहीर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविले आहे. मराठवाड्याच्या विकासावर गप्पा मारणाऱ्यांना हा अन्याय दिसत नाही का, अशी टिका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. क्रीडा विद्यापीठ का पळविले हा प्रश्न पालकमंत्री सुभाष देसाई यांना विचारणे आवश्यक आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी क्रीडा विदयापीठ पळविणाऱ्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अटक झाली तरी आमचे आंदोलन चालू राहणार आहे. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. खासदार इम्तियाज यांनी शनिवारी ( ता. १४) फेसबुक लाईव्ह करून १५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री देसाई यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. क्रीडा विद्यापीठ पळविणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जेव्हा आयआयएम आणि एम्सबाबत स्पष्टीकरण देत असताना औरंगाबादला इन्स्टीट्यूट ऑफ प्लानिंग, आर्किट्रेक्चर देण्याची घोषणा केली, तेव्हा विधानसभेत हे इन्स्टीट्यूट विदर्भाला न्या, आम्हाला आयआयएम दया, अशी मागणी केली होती अशी माहिती त्यांनी दिली. क्रीडा विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्राला नेण्याचा घाट सुरू झालयानंतर, औरंगाबादच्या बैठकीत क्रीडा विद्यापीठ बाबत मी माहिती सांगितली असता, पालकमंत्री देसाई यांनी हे विद्यापीठ औरंगाबादलाच राहिल, असे आश्वासन दिले होते. मात्र क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्यात आले. कोणाच्या दबावाखाली हा विद्यापीठ पळविले असा सवाल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT