sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : पैसे वाचविण्यासाठी चक्क दुकानाचे रूपांतर बारमध्ये ; दुकानातच मद्यपींना बसण्यासाठी सर्रास जागा उपलब्ध

संग्रामनगरमधील दारूचे दुकान स्थानिक रहिवाशांच्या आंदोलनामुळे बंद झाले. मात्र, दारूच्या दुकानांचा त्रास सर्वत्रच आजूबाजूच्या रहिवाशांना होत आहे. जागोजागी थाटलेल्या बिअर शॉपींनी तर चक्क दुकानाचे रूपांतर बारमध्ये केले. येथे केवळ विक्रीसाठी परवानगी असताना अनेक चालकांनी सर्रासपणे मद्यपींना पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : संग्रामनगरमधील दारूचे दुकान स्थानिक रहिवाशांच्या आंदोलनामुळे बंद झाले. मात्र, दारूच्या दुकानांचा त्रास सर्वत्रच आजूबाजूच्या रहिवाशांना होत आहे. जागोजागी थाटलेल्या बिअर शॉपींनी तर चक्क दुकानाचे रूपांतर बारमध्ये केले. येथे केवळ विक्रीसाठी परवानगी असताना अनेक चालकांनी सर्रासपणे मद्यपींना पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ‘सकाळ’ने डमी ग्राहक पाठवून केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार समोर आला. यापैकी अनेक शॉपी या नागरी वस्तीत असून दारू पिल्यानंतर तळीराम रस्त्यावरच गोंधळ घालतात, हे देखील आढळले.

शहरातील बिअर शॉपी चालकांनी मात्र आपला धंदा वाढावा म्हणून वेगळीच शक्कल लढवली आहे. परमीट रूममध्ये दारू पिण्यासाठी गेल्यानंतर मद्यपीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. हे पैसे वाचविण्यासाठी अनेक मद्यपी शॉपीमधून बिअर खरेदी करतात. त्यामुळे अनेक शॉपी चालकांनी माल ठेवण्याच्या गोडाऊनलाच परमीट रूमचे स्वरूप दिले आहे. समोर दुकान आणि मागे ग्राहकांसाठी जागा, असे त्याचे स्वरूप आहे.

पाहणीत आढळले...

नागेश्वरवाडी : या भागात भर वसाहतीत बिअर शॉपी आहेत. या ठिकाणी ग्राहकाला पाठवण्यात आले. त्याने चालकाला बसण्यासाठी जागा आहे का, अशी विचारणा केली. यावर त्याने दहा रुपये चार्ज लागेल, असे सांगत पाठीमागे जाऊन लवकर आवरा अशी सूचनाही केली.

उस्मानपुरा : येथील चालकाने दुकानाच्या बाजूलाच एका खोलीत स्टँडिंग व्यवस्था केली आहे. ‘पोलिसांची काही अडचण येणार नाही का’, असे विचारले असता चालकाने डमी ग्राहकाला निवांत बसण्याचा सल्ला दिला.

मुकुंदवाडी : येथील बिअर शॉपीमध्ये देखील मागील गोडाऊनमध्येच बसण्याची व्यवस्था आहे. घोळक्याने तरुण या ठिकाणी मद्य रिचवताना दिसून आले. चालकाने डमी ग्राहकाला ‘बैठो, कुछ नहीं होता’ असे म्हणत धीर दिला.

चखना, ग्लासची देखील सोय

बिअर शॉपीचालकांनी धंदा वाढवण्यासाठी शक्कल लढवली आहे. या ठिकाणीच ग्राहकाला बिअर सोबतच खाण्यासाठी, चिवडा, वेफर्सची पाकिटे तसेच पिण्यासाठी डिस्पोजल ग्लासची देखील सोय करून देतात. यासाठी ग्राहकाकडून वेगळा चार्ज आकारण्यात येतो.

नियम धाब्यावर;

कारवाईत सातत्याची गरज : परमीट रूममध्ये ग्राहकाला बसण्यासाठी व्यवस्था करून दिली जाते, याला ऑन ट्रेड म्हणतात. बिअर शॉपीत पिण्याची परवानगी नसते, याला ऑफ ट्रेड म्हणतात. चालकांनी नियम धाब्यावर बसवून ऑफ ट्रेडमध्येच अवैधरीत्या ग्राहकाला पिण्याची परवानगी देण्यात येत असल्याने दारुड्यांचे चांगलेच फावले आहे. पोलिसांनी मध्यंतरी वाइन शॉपच्या आजूबाजूला दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मंडळींना दणका दिला होता.

बिअर शॉपीमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. बिअर शॉपीमध्ये ग्राहकाला बसण्याची परवानगी नाही. अशा प्रकारचे कृत्य कोणी करत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई होते. त्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतो. ते याबाबत दंडात्मक कारवाई किंवा अन्य निर्णय घेऊ शकतात.

— संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

शहरात नागरी वसाहतीमध्येच वाइन शॉप, बिअर शॉपी आहेत. मुळात नागरी वसाहतीमध्ये परवानगीच देता कामा नये. दिलेली असेल तर संबंधित विभागाने त्यांना दिलेल्या नियमावलींची काटेकोरपणे तपासणी होते का, हे देखील पाहावे.

— छाया देवराज, नागरिक

गल्लीबोळातील बिअर शॉपीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना मद्यपींच्या गोंधळाला सामोरे जावे लागते. याला परवानगी देताना संबंधित विभागाने काळजी घ्यावी. सामाजिक सुरक्षेचा हा प्रश्न आहे. चालक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.

— भारती भांडेकर, जागृती मंच

मध्यवर्ती शहरात देखील नागरी वसाहतीमध्येच बिअर शॉपी सुरू आहेत. त्यांच्या आसपास शाळा, क्लासेस, कॉलेज आहेत. येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होतो. तसेच स्थानिक रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा गोंधळ सुरू असतो.

— किरण शर्मा, महिला सुरक्षा समिती सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT