मोबीन शेख - सकाळ वृत्तसेवा
वैजापूर (जि.औरंगाबाद) : शहरातील Vaijapur वीज ग्राहकांकडे तब्बल २ कोटी ७४ लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत वीजबिल भरा, नाही तर वीज जोड तोडण्यात येईल, असे फर्मान महावितरणने Mahavitran सोडले आहे. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांकडून वीजबिल वसुलीची उद्दिष्टपूर्ती होणार नाही. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय कर्मचाऱ्यांसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. आर्थिक वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरणतर्फे दरवर्षी विविध फंडे अवलंबिले जातात. वीज बिल Electricity Bill भरण्याचे आवाहन करणारी वाहने शहरात फिरतात, मराठी आणि हिंदी भाषेत अनाउन्समेंट करुण बिल भरण्याचे आवाहन करतात. बिल भरा, नाही तर वीज खंडित केली जाईल, असे सांगितले जातात. वैजापूर वीज मंडळाकडून वसुलीची उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने थकबाकीदारांचा आकडा फुगला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे Aurangabad वरिष्ट कार्यालयाने नाराजी व्यक्त करत ३० जूनपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश येथील अधिकाऱ्यांना दिले आहेत. in vaijapur above 2 crores electricity bill not paid aurangabad
करोना Corona महामारीत वसुलीचे गणित बिघडल्याने येथील थकबाकीचे बजेट महावितरणचे फुगले आहेत. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याने कर्मचारी रस्त्यावर उतरून वीजबिल वसूलीसाठी गल्ली बोळात फिरताना दिसत आहेत. वैजापूर शहरातील ४ हजार ३४४ घरगुती ग्राहकांकडे १ कोटी ८० लाख ५२ हजार रूपये तर ९२२ कमर्शियल ग्राहकांकडे ७१ लाख ११ हजार रूपये तसेच शासकीय कार्यालयांकडे ६ लाख ६३ हजार रूपये अशी एकूण थकबाकी २ कोटी ७० लाख रूपये एवढी असून ही वसुली महावितरणने सुरु केली आहे. महावितरणकडून वीज बिल शून्य थकबाकीची मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे. वीज बिल वसूलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मोबाईल वरून, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅश कार्डसह विविध पर्याय तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट टाकून वीज बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
शहरात वीज ग्राहक १० हजारपेक्षा अधिक आहे. त्यापैकी निम्मे ग्राहक थकबाकी मध्ये आहे. यामध्ये नामांकीत लोकांकडे सुद्धा मोठी थकबाकी असल्याने वसुली मोहीम सक्तीने सुरु केली आहे.
- अविनाश जेंगठे, वैजापूर, शहर अभियंता महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.