Inauguration of Dairy Modernization Project in Aurangabad
Inauguration of Dairy Modernization Project in Aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

उत्पादकांच्या कष्टातूनच दूध संघ उभा -आमदार हरिभाऊ बागडे

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जिल्हा दूध संघाच्या वाटचालीत दूध उत्पादकाला महत्त्वाचा दुवा मानून काम केले. त्याचे देणे लागतो, या भावनेतून 80 टक्‍क्‍यांपर्यंतची रक्‍कम उत्पादकाला कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कष्टामुळेच दूध संघ उभा राहिल्याची भावना माजी विधानसभा अध्यक्ष व दूध संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 27) व्यक्‍त केली. 

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गांधेली येथील दुग्धशाळेत विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाचे राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आमदार उदयसिंग राजपूत, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत पी. मोहड, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था जे. बी. गुट्‌टे, एनडीडीबीचे प्रादेशिक संचालक ए. के. हातेकर, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळे, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. बागडे म्हणाले, की दूध संस्थांनी स्टीलच्या कॅनचा वापर करण्यावर भर द्यावा. थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यामुळेच काम अधिकाधिक पारदर्शी कसे होईल असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ करता आली याचे समाधान आहे. संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी प्रास्ताविक केले. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

संघाला सर्वतोपरी सहकार्य : कॅबिनेट मंत्री भुमरे 

आधीचा दूध संघ व आताचा आधुनिकतेचा स्वीकार केलेला दूध संघ पाहता बदल घडविण्याची किमया संघाचे अध्यक्ष बागडे यांनी करून दाखविली. दूध संघाच्या एकूणच कामात सर्वतोपरी सहकार्याची आपली भूमिका राहील, असे आश्‍वासन फलोत्पादन व रोजगार मंत्री संदीपान भुमरे पाटील यांनी दिले. 

ही आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये 

  • - विस्तारीकरणामुळे प्रकल्पाची क्षमता झाली दुप्पट 
  • - दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी अत्याधुनिक मशिनरीची उभारणी 
  • - स्वयंचलित दुग्धशाळा व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती. 
  • - पदार्थांचा दर्जा उत्तम ठेवण्यावर अधिक भर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT