Indian Student Returned From Ukraine In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

Ukraine|'घबराट निर्माण करणारा प्रवास क्षणाक्षणाला मायदेशाची आठवण करून द्यायचा'

युक्रेन ते भारत व्हाया रोमानिया असा बावीस तास खडतर प्रवास करुन विद्यार्थी पोहोचला औरंगाबादेत

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद ) : युक्रेन ते भारत व्हाया रोमानिया, बस, फाईट व रेल्वे असा जवळजवळ २२ तास प्रवास करून अखेर सुखरूप घर गाठले. आणि आई, वडिलांच्या गळ्यात पडून मोदी सरकारचे धन्यवाद मानले. घबराट निर्माण करणारा हा प्रवास क्षणाक्षणाला मायदेशाची आठवण करून देणारा होता, असे युक्रेनहून (Ukraine) भारतात सुखरूप परतलेल्या बजाजनगर येथील विद्यार्थ्याने सकाळशी बोलताना शुक्रवारी (ता.११) सांगितले. बजाजनगर येथील ३१ वर्षीय सचिन बच्चाप्रसाद सिंग हा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेण्यासाठी युक्रेनमध्ये सुमारे दोन वर्षांपासून राहत होता. नुकताच तो युक्रेनवरून बजाजनगरात परतला. (indian Student Returned From Ukrine In Aurangabad)

याबाबत तो सांगतो की, त्याच्यासोबत पुणे, युपी, बिहार, झारखंड येथील ही सहकारी होते. युक्रेन आणि रशियाचे (Russia) युद्ध भडकल्याने सर्वच विद्यार्थ्यांना (Indian Students In Ukraine) असुरक्षितता भासत होती. त्यांना भारताची ओढ लागली, कितीही प्रयत्न केले तरीही यूक्रेन सोडता येत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी घराच्या आतुरतेने कासावीस होत होते. अशातच सचिन सिंह यासह भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी घरी येण्यासाठी पायीपायीच २५ किमी पोलंड सीमा गाठली. मात्र प्रवेश नाकारल्याने त्यांना परत माघारी युक्रेनच्या लव्हीव शहरात परतावे लागले. दिवसेंदिवस युध्दाचा भडका उडत असल्याने भारताने 'मिशन गंगा' या मोहिमेअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यास सुरुवात केली. आणि बजाजनगर येथील सचिन सिंग यासह भारतातील विद्यार्थ्यांनी युक्रेन ते रुमानिया असा अंदाजे ५०० किलोमीटर प्रवास बसने सुमारे सात तासात केला. तेथे कागदपत्रे पूर्ण करण्यास चार दिवस लागले. सर्व कायदेशीर पूर्तता पूर्ण झाल्यानंतर सात तासांच्या अवकाशाने हे विद्यार्थी विमानाने भारतातील मुंबई शहरात उतरले. तेथून सचिन सिंग याने रेल्वेने औरंगाबाद व तेथून बजाजनगर गाठले.

बावीस तास प्रवास

२८ फेब्रुवारी रोजी निघालेले हे विद्यार्थी टप्प्याटप्प्याने युक्रेन ते भारत व्हाया रोमानिया व मुंबई ते औरंगाबाद, बजाजनगर येथे पोहोचले. त्यासाठी बस, फाईट व रेल्वे असा जवळजवळ २२ तास प्रवास करावा लागला. घरी सुखरूप पोहोचताच त्याने आईवडिलांच्या गळ्यात पडून प्रवासातील अनुभव सांगितला.

सचिनचे वडील कामगार

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सचिनचे वडील बच्चासिंग हे वाळूज येथील बिकेटी (बाळकृष्ण टायर्स) या कंपनीत कामगार आहेत. आई लालसासिंग या गृहिणी आहे. तर एक मोठा भाऊ असून तो पंजाब येथे इंजिनिअर म्हणून काम करतो.

तहसीलदारांनी केली विचारपूस

दरम्यान युक्रेन वरून बजाजनगर येथे आलेल्या सचिनची त्याच्या घरी जाऊन अपर तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी लक्ष्मण गाडेकर, तलाठी रघुनाथ शेळके यांनी जाऊन त्याच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT