Aurangabad News  
छत्रपती संभाजीनगर

इन्फोसिस कंपनीच्या पुल कॅंपसमध्ये 133 विद्यार्थ्यांना नोकरी

अतुल पाटील

औरंगाबाद : कांचनवाडीतील छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे पुल कॅंपस घेण्यात आले. ऑनलाईन चाचणी, मुलाखतीनंतर 133 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 3 लाख 60 हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे.

इन्फोसिस डिजिटल सेवा देणारी जगातील अग्रगण्य व भारतातील मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. मराठवाडा आणि खान्देशसाठी 2008 नंतर पहिल्यांदाच कंपनीतर्फे मुलाखती घेण्यात आल्या. शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यातर्फे 28 ते 30 जानेवारी दरम्यान पुल कॅंपस पार पडला. औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी संलग्नित महाविद्यालतून विद्यार्थी आले होते.

छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात 28 आणि 29 जानेवारीला 1360 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी दिली. यातून 30 जानेवारीला 191 विद्यार्थ्यांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन ऍप्टीट्युड, टेक्‍निकल मुलाखती, एच. आर. मुलाखती झाल्या. ऑनलाईन ऍप्टीट्युडमध्ये कॉन्टिटेटिव्ह टेस्ट, रिझनिंग टेस्ट, व्हर्बल ऍबिलिटी टेस्ट झाली.

इन्फोसितर्फे अंतिम 133 विद्यार्थ्यांची सिस्टीम इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे ई मेल विद्यार्थ्यांना करण्यात आले आहेत. नियुक्‍ती पत्र लवकरच मिळणार आहे. अंतिम निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 लाख 60 हजार रुपयांचे वार्षिक वेतन मिळणार आहे. कंपनीतर्फे एच.आर. विभागाचे अनिवेश जोशी, केदार कुलकर्णी, नितीन परदेशी आदींची उपस्थिती होती.

शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मिता खराद, स्नेहल दिघे, अक्षय गवळी, विशाल बारगळ, सुरज रामरख्या आदी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुल कॅंपससाठी टीपीओ प्रा. दीपक पवार, डॉ. गिरीश काळे यांनी पुढाकार घेतला.


मराठवाड्यात इन्फोसिससारखी चांगली कंपनी आली. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी इंग्रजीत सुधारणा केल्यास आणखीन मोठी संधी मिळू शकते.
- डॉ. उल्हास शिंदे, प्राचार्य, छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय, कांचनवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT