Aurangabad News INFOSYS Pool Campus Recruitment Drive
Aurangabad News INFOSYS Pool Campus Recruitment Drive 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत सुरूय इन्फोसिसची मेगाभरती

अतुल पाटील

औरंगाबाद - इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीच्या पुल कॅंपस कांचनवाडीतील छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात होत असून मंगळवारी (ता. 28) पहिल्या दिवशी 900 पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऍप्टीट्युड परीक्षा दिली. यातून 148 विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे. 28 ते 30 जानेवारीदरम्यान हा पुल कॅंपस चालणार आहे.

इन्फोसिस डिजिटल सेवा देणारी जगातील अग्रगण्य व भारतातील मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. ही कंपनी 46 देशात कार्यरत आहे. इन्फोसिसतर्फे होत असलेल्या मुलाखतीसाठी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी संलग्नित महाविद्यालतील पात्र विद्यार्थी आले आहेत. मराठवाडा आणि खान्देशसाठी सात वर्षानंतर पहिल्यांदाच इन्फोसिस कंपनी मुलाखती घेत आहे.

शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात 28 ते 30 दरम्यान पुल कॅंपस होत आहे. 29 जानेवारीला 900 विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. तर, 29 जानेवारीला 1100 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर दोन्ही परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांच्या 30 जानेवारीला मुलाखती होणार आहेत. मुलाखतीची जबाबदारी एच.आर. विभागाचे अधिकारी अनिवेश जोशी पार पाडत आहेत.

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन ऍप्टीट्युड, टेक्‍निकल मुलाखती, एच. आर. मुलाखती होणार आहेत. ऑनलाईन ऍप्टीट्युडमध्ये कॉन्टिटेटिव्ह टेस्ट, रिझनिंग टेस्ट, व्हर्बल ऍबिलिटी टेस्टचा समावेश आहे. तसेच ऍप्टीट्युड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वरील तिन्ही सेक्‍शनमध्ये चांगले गुण मिळणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना 12 जानेवारी 2020पूर्वी नावनोंदणी करणे अनिवार्य होते. अंतिम निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 लाख 60 हजार रुपयांचे वार्षिक वेतन मिळणार आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, टीपीओ प्रा. दीपक पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT