महावितरण sakal
छत्रपती संभाजीनगर

रोहित्र अन् कृषिपंपांचे नुकसान टाळण्यासाठी कॅपॅसिटर बसवा

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत.

त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात.

ऑटोस्विच नकोच महावितरणकडून कृषिपंपांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ’ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो.

परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटो स्विचचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT