3crime_201_163 
छत्रपती संभाजीनगर

नोकरीचे अमिष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक, संस्थाचालक पिता-पुत्राला अटक

अनिल जमधडे

औरंगाबाद : नुतन बहुउद्देशील संस्थेत नोकरीचे अमिष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव पिता-पुत्राला अटक करण्यात आली. त्यांना मंगळवार (ता. वीस) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी दिले आहेत. नुतन बहुउद्देशीय संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाची अनुदानित जागा असल्याचे सांगून २२ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार मनिषा कुलकर्णी (रा. नवजिवन कॉलनी) यांनी सिडको पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये संस्थाचालक जनार्धन म्हस्के, सचिव राहुल जनार्धन म्हस्के यांना रविवारी (ता. १९) अटक करण्यात आली.

याप्रकरणी मनीषा कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना म्हस्के यांनी २०१५ मध्ये समाजशास्त्रच्या अनुदानित रिक्त जागेसाठी २२ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार श्रीमती कुलकर्णी यांनी दहा लाख रुपये दिले. नियुक्ती पत्राच्या वेळी पुन्हा साडेपाच लाख रुपये दिले. त्यानंतर ५ जुन २०१५ रोजी कुलकर्णी यांना सहशिक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले. मात्र संस्थेला अनुदान नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी चौकशी केली असता अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. अनुदान मिळणारच असल्याचे सांगत उर्वरीत पैशांची मागणी केली. त्यामुळे कुलकर्णी यांनी चेकद्वारे पैसे दिले. पैसे दिल्यानंतरही कायम नेमणुकीचे आदेश दिले नाहीत, आणि पैसेही परत दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने श्रीमती कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १८ जानेवारी २०२० रोजी सिडको पोलिस तक्रार दिली होती. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT