खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. सध्या बाजारात खते व बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. पाऊस पडल्यावर तर तोबा गर्दी होणार आहे.
औसा (जि.लातूर) : कोरोना संक्रमण (Corona Infection) रोखण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनासह म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण वाढत असताना रासायनिक खतांची विक्री (Fertilizers Selling) ही पॉस (e-pause machine) यंत्राद्वारेच करावी, या शासनाच्या हट्टामुळे शेतकऱ्यांसह दुकानदारांना भीतीने ग्रासले आहे. यंत्रावर बोट लावावे लागत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांचे (Farmer) आधार फोन नंबरला लिंक नसल्याने आधार क्रमांक टाकून ओटीपी मिळविण्यास अडचणी येत असल्याने सिझनमध्ये खत विक्री कशी करावी? याची काळजी सर्वांना लागली आहे. सध्या रेशन दुकानदारांना अंगठा न घेता रेशन वितरणाची ऑफलाईन परवानगी दिली असताना खतांच्या विक्रीसाठी पॉसची सक्ती कशासाठी असा प्रश्न दुकांदारासह शेतकऱ्यांना पडला आहे. (It Chances To Spread Corona Through e-Pause Machine)
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. सध्या बाजारात खते व बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. पाऊस पडल्यावर तर तोबा गर्दी होणार आहे. सध्या कोरोना संक्रमण जरी आटोक्यात आले असल्याचे दिसत असले तरी खत विक्रीसाठी पॉस यंत्राची शासनाची सक्ती कोरोना संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. पॉस यंत्रावर अंगठा लावावा लागतो. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला तो संक्रमित करू शकतो. सॅनिटायझरचा जास्त वापर केला तर मशीनचे स्कॅनर खराब होत आहेत. अनेक शेतकऱ्यांचा ठसाच यंत्र घेत नाही, अशा वेळी एका ग्राहकाला पंधरा ते वीस मिनिटे व कमीत-कमी पाच ते दहा मिनिटे लागतात. मग ऐन गर्दीच्या वेळेत हा खेळ दुकानदारांसह शेतकऱ्यांना अडचणींचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने विक्रीची परवानगी दिली असताना खत दुकानदारांना व शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या शासनाच्या या आडमुठ्या धोरणावर सगळीकडून टीका केली जात आहे.
कोरोना काळात आम्ही जीव मुठीत धरून आमचा व्यवसाय करीत आहोत. पॉस मशीनची सक्ती ही आमच्यासह शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी असल्याने आम्हाला ऑफलाईन विक्रीची परवानगी द्यावी. अनेक शेतकरी कोरोनामुळे घरी बसून वाहनवाल्याकडे आधार व पैसे देऊन खते आणायला लावत असल्याने त्यांचा अंगठा कसा घ्यावा? बहुतांश शेतकऱ्यांनी आधार फोन नंबरला लिंक न केल्याने त्यांचा ओटीपी येत नाही. वेळोवेळी आमची तपासणी करा पण या कोरोना काळात तरी पॉसची सक्ती शिथिल करा, अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे.
- सचिन हुरडळे, उपाध्यक्ष, फर्टिलायझर्स असोसिएशन, औसा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.