national digital livestock mission Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar News : एक जून पासून पशुधनाला 'बिल्ला' असणे बंधनकारक

आडुळ: ईअर टॅगिंग शिवाय जनावरांची खरेदी-विक्री व वाहतुकीवर बंदी

मुनाफ शेख

आडुळ : आपले पशुधन आपली तिजोरी, कानाला बिल्ला लावुन नोंद करा शासन आपल्या दरबारी. अशी हाक देत पैठण तालुका पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारच्या सुचनेनुसार नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत तालुक्यातील सर्व प्रकारच्या पशुधनास बिल्ला (ईअर टॅगिंग) मारून घेणे बंधनकारक केले असून कानातील बिल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे.

शिवाय जनावरे आजारी पडल्यास त्यांना पशुवैद्यकिय सेवा देखील मिळणार नसल्याची माहिती पशु वैद्यकिय विभागाने दिली आहे. त्यामुळे पशुपालकांना यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या पशुधनाच्या कानात बिल्ला असणे आता शासनाने बंधनकारक झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. कानात बिल्ला नसलेल्या पशुधनाची बाजार समिती, आठवडी बाजार व गावात होणारी खाजगी खरेदी विक्री करण्यास १ जुन नंतर प्रतिबंध आहे. कानात बिल्ला नसलेल्या पशुधनाची वाहतूक केल्यास पशुपालक व वाहनधारक यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील. आता ग्रामपंचायतींना पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना दाखल्यावर कानातील बिल्ला क्रमांक टाकला जाणार असल्याने पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो दिला जाणार नाही.

पैठण तालुक्यात एकुण १६४६०५ येवढी जनावरे असुन पशुपालकांनी तत्काळ आपापल्या पशुंना बिल्ला मारुन घ्यावा नसता त्यांना १ जुन नंतर पशुवैद्यकिय दवाखान्यात वैद्यकिय सुविधा देखील मिलणार नाही शिवाय नैसर्गिक आपत्तीत किंवा एखाद्या आजाराने जनावरांचा मृत्यु झाल्यास हि जनावरे शासकिय मदतीस पाञ ठरणार नाही.

संजय खाचणे ( सहायक आयुक्त, पैठण)

आडुळ दवाखान्या अंतर्गत गावात ३५०० जनावरे असुन यातील बरेच पाशुपालक यांनी जनावरांना बिल्ले लावले असुन उर्वरीत जनावरांना बिल्ले लावण्याचे काम प्रगती पथावर आहे, तरी सर्व पशुपालकांनी १ जुन च्या अगोदर आपापल्या पशुंना बिल्ले लावुन घ्यावेत.

- अश्विनी राजेंद्र ( पशुवैद्यकिय अधिकारी, आडुळ)

बिल्ला ठरणार जनावरांचा आधार कार्ड

नैसर्गिक आपती, दुष्काळ, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी अशा आपत्तीच्या वेळी भरपाई देतांना पशुधनाच्या कानात असलेला बिल्ला महत्वाचा ठरणार असल्याने तो एक प्रकारे पशुंचे आधार कार्डच ठरणार आहे. बिल्यामुळे भरपाईची रक्कम ताबडतोब पशुपालकाच्या खात्यात जमा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT