निराधार वेदनेची कहाणी, पिकांत साचले पाणी sakal
छत्रपती संभाजीनगर

जालना : निराधार वेदनेची कहाणी, पिकांत साचले पाणी

पाडोळी खुर्दच्या सोजरबाई टेकाळेची व्यथा

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव : पती नाही, मुलगा नाही, पाच विवाहित मुली, जीवन जगायला अडीच एकर जमिनीचा आधार, त्यात पेरणी,बियाण्याची अडचण, कोणाकडून पेरणी करून घ्यायची तर कोणाकडून उसनंपासनं करून बियाणं आणायचं नाही दिलं तर मुलीकडून घ्यायचं, मजुर लावून शेती करायची त्याच पाचवीला पुजलेले दुखणं. यावर्षी रीन काढून खर्च केला, अडीच एकरात कापूस लावला,पीक चांगले आले, खर्चापाणी जाऊन सालसंधी होईल अशी आशा होती, मात्र पावसाने हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला सगळ्या कापसाच्या शेतात पाण्याचे तळे साचले. खरीप गेलंच मात्र रब्बीसाठीही काही करता येत नाही, जमीन नापिक झाल्याचे पाडोळी खुर्दच्या सत्तर वर्षीय महिला शेतकरी सोजरबाई डोळ्याला पाणी आणून सांगत होत्या.

सोजरबाई टेकाळे यांनी यावर्षी उसनवारी करून शेतात कापसाची लागवड केली. यासाठी नांगरणी चार हजार रुपये, रूटर दोन हजार रुपये, बियाणे दोन हजार रुपये, लागवडीचा खर्च एक हजार रुपये, सात हजार रुपयाचं खत, चार हजाराचे फवारे असा खर्च केला. सुरुवातीला पावसाने खंड दिला, पीक हातच जात की काय भिती वाटू लागली मात्र त्यानंतर पाऊस आल्याने पिकाला जीवदान मिळाले.यावर्षी चांगला कापूस निघेल अशी आशा होती मात्र दीड ते दोन महिने सतत पाऊस,कधी अतिवृष्टी यामुळे शेतातील पाणी आटलंच नाही. सततच्या पावसाने शेतात तळ साचलं आणि कापसाचे पीक पाण्यात आहे.

पिकात कमरेपर्यंत पाणी आहे, शेतात जायला रस्ता नाहीतर पाण्यातला कापूस आठ दिवसाच्या उन्हामुळे फुटला आहे, काही बोंड सडून गेली तर काही काळी पडली,फुटलेला कापूसही पाण्यात पडत आहे.

हातातोंडाला आलेला घात हिरावला गेला आहे तर दुसरीकडे कापूस उपटून रब्बीची पेरणी करणेही शक्‍य नाही, जमीन चिबडली, नापिक झाली आहे यामुळे कशातंच मन लागत नाही, त्यात तब्येतही साथ देत नाही. कोणाचा आधार नाही,कुठं मजुरीलाही जाता येत नाही यामुळे उपजीविका करावी कशी हाच प्रश्‍न पडला आहे, असे सोजरबाई यांनी सांगितले.

सततच्या पावसाने खरिपाचा हातातोंडाचा आलेला घास गेला,शेतात पाणी आहे,कापूस वेचता येत नाही.रब्बी हंगाम तोंडावर आला आहे शेत तयार करता येत नाही.पाऊस उघडुनही वापसा व्हायला तयार नाही,जमीन नापिक झाली आहे.शासनाने जरी मदत जाहीर केली असली तरी तुटपुंजी मदत कधी मिळणार,या मदतीने काय होणार.

- सोजरबाई टेकाळे, महिला शेतकरी, पाडोळी खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT