Arrested News.jpg..jpg 
छत्रपती संभाजीनगर

वकीलाला मिळाली जेलची हवा....बॅंकेला ४२ लाखांचा....

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: बनावट सोने गहाण ठेवून व्हॅल्युअरच्या मदतीने टाऊन सेंटर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेला ४२ लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील मुख्य आरोपी वकीलाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले. गंगाधर नाथराव मुंढे (४०, ज्योती नगर) असे त्या आरोपी वकीलाचे नाव आहे. आरोपीला हर्सूल कारागृहात हलविण्यात आले. 

प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या टाऊन सेंटर सिडको येथील शाखेचे अधिकारी अच्युत दत्तराव दुधाटे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, वकील गंगाधर मुंढे व मंगेश नाथराव मुंढे या दोघांनी गोल्ड व्हॅल्युअर रमेश उदावंत याच्या साहाय्याने बनावट सोने बॅंकेत ठेवून ४२ लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी वकील गंगाधर मुंढे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरापी गंगाधर मुंढे हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून त्याने त्याच्या हस्ताक्षराचा तपास करणे आहे. आरोपीचा भाऊ मंगेश मुंढे पसार असून त्याला देखील अटक करणे आहे.

आरोपी गंगाधर विरोधात क्रांती चौक, हर्सूल, वेदांतनगर, जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे ॲड. रोहन अशोकराव नवले यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

Manoj Jarange: ''शिंदेंकडे पैसाच गेला नसेल तर त्यांना बदनाम का करायचं..? माझ्याकडे आणखी चार क्लिप'' जरांगे पाटलांनी दिला क्लू

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

Moral Policing Horror in Kolkata : १८ वर्षीय मुलासह वडिलांना विवस्त्र करून फिरवले; कोलकातामधील या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने खळबळ!

'धुमधडाका' मधील यदुनाथ जवळकर खरंच आले! अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ व्हायरल; गाडीत बसताना काढली चप्पल

SCROLL FOR NEXT