Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad| किर्तनकार 'बाबाचा अश्लील व्हिडिओ' व्हायरल, वारकरी संप्रदाय आक्रमक

महिलेने विषप्राशन करुन आत्महत्येचा केला प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सध्या पुरुष आणि महिला किर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. व्हिडिओतील किर्तनकार महाराजाची जिल्ह्यात प्रसिद्ध किर्तनकार म्हणून ओळख आहे. या प्रकारामुळे वारकारी संप्रदाय संघटनेने किर्तनकार महाराजावर (Kirtankar Maharaj) कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओत (Viral Video) त्या 'बाबा' बरोबर नको त्या अवस्थेत दिसणारी महिला देखील किर्तनकार आहे. तसेच दोघांचेही यू ट्यूबवर मोठ्या प्रमाणावर फाॅलोअर्स असून त्यांना मानणाऱ्या अनुयायांची संख्याही मोठी आहे. अश्लील व्हिडिओ महाराजाने चित्रित केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. (Kirtankar Maharaj Video Viral In Aurangabad)

त्यामुळे बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यावर किर्तनकार महिलेने विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. महिलेवर औरंगाबाद (Aurangabad) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या पुरुष किर्तनकाराने टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी त्याच्यावर त्याचे नातेवाईक लक्ष ठेवून असल्याचे माहिती कळते.

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी सदरील किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की त्या दोघांनीही लाखो भाविकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला आहे. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीचे अश्लील प्रदर्शन करुन त्यांनी ती आस्था पायदळी तुडवली असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT