Sambhaji Nagar News  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : विकास आराखड्यामध्ये कागदपत्रांचा ‘झोल’

दस्तऐवजांचे बनावटीकरण, कागदपत्रांमध्ये छेडछाड ; उच्चस्तरीय चौकशी करण्याचे विभागीय आयुक्तांकडून पत्र

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश तयार केले. त्यानंतर मंजूर आराखड्यातील नाविकास क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात छेडछाड करून व दस्तऐवजांचे बनावटीकरण करून अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार उघड झाले आहेत. या गैरप्रकारांमुळे शासनाची आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कारवाई तातडीने करावी, असे पत्र विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी नगररचना विभागाच्या संचालकांना पाठविले आहे.

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एएमआरडीए) कार्यालयामध्ये कार्यरत असणारे नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या घटनांना आळा बसवा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्राप्त प्रकरणांची चौकशी करणे व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, स्वतःहून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने अथवा संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केली जात नसल्याने मंजूर आराखड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुचित फेरबदल होत आहेत.

यामुळे विकास आराखड्याचा मूळ उद्देश साध्य होणार नाही, अशी आपली धारणा असल्याचेही विभागीय आयुक्त आर्दड यांनी संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महानगराबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय हा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ शी निगडित असल्याने व तांत्रिक स्वरूपाचा असल्याने; तसेच वरील गैरप्रकारामुळे शासनाची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे.

महानगराच्या नियोजनबद्ध विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनास प्रतिकूल ठरत असल्याची शक्यता व्यक्त करून याबाबत आपल्या स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी व्हावी; तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी विनंतीही आर्दड यांनी नगररचना विभागाच्या संचालकांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणूक : महायुतीचे खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

१०० कोटींचा सिनेमा, अभिनयात दिली जिनिलियाला टक्कर, आता 'वेड' फेम अभिनेत्रीला मिळत नाहीये काम, म्हणते- दुसरा पर्याय...

SCROLL FOR NEXT