covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

दुर्दैवी! आई, आजी, मावशीनंतर पत्नीलाही कोरोनाने हिरावले

सावंगीच्या जगताप कुटुंबावर मोठा आघात, कोरोनाने कुटुंबातील अनेक माणसं गेली

अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (औरंगाबाद): कोरोनाचा आघात एखाद्या कुटुंबावर किती दुर्दैवी ठरू शकतो आणि या मृत्यू तांडवानंतर उर्वरित कुटुंबियांवर हा तडाखा सहन करण्याशिवाय कसलाही पर्याय नसतो तेव्हा हतबलतेने हे धक्के सहन करावे लागतात.अगदी अशीच स्थिती ओढवली आहे लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायतीतील सावंगी (ता.गंगापूर) गावच्या संदीप जगताप यांच्यावर. जगताप कुटुंब या ओढवलेल्या परिस्थितीत धीरोदात्तपणे मनस्थिती सांभाळून संकटाला सामोरे जात आहे. लासूर स्टेशनला बाजार समितीअंतर्गत आडत दुकानांवर मुनीम असलेल्या संदीपच्या कुटुंबात आता वडील, भाऊ, भावजय, दोन मुले आहेत. संदीपच्या आई, आजी, मावशी आणि आता परवा मंगळवारी (ता.15) पत्नी सुनीता संदीप जगताप हिचा कोरोनाने मृत्यू झाला. दोन महिन्यांत कोरोनाने संदीपच्या कुटुंबातील चार महिला मृत पावल्या.

एप्रिलमध्ये अवघ्या आठ दिवसाच्या अंतरात आई, आजी, मावशी या तीन महिला कोरोनाचा संसर्ग होऊन मरण पावल्या. आता दोन महिन्यांपासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या संदीपची पत्नी सुनीताचाही बळी कोरोनाने घेतला. सहा वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी असलेल्या या दोन लेकरांच्या आईला अखेर कोरोनामुळे जीव गमवावा लागला. अगोदर एप्रिल महिन्यात पद्माबाई पुंडलीक जगताप (आई, वय 55), सुभद्राबाई बारकु कळमकर (आजी, वय 74), कमलबाई पोपटराव ढंगारे (मावशी,वय 50) व आता दोन महिन्यानंतर जून मध्ये सुनीता जगताप (पत्नी, वय 28) या अशा चार महिलांना कोरोनाने गिळंकृत केल्याने हतबल संदीपवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घरातील दोन महिला आई, आजी कोरोनाने मृत्यू पावल्यानंतर पत्नी सुनीताही कोरोनाशी झुंजत होती. घरात कोणी मोठी महिला नसल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी आलेल्या धोंदलगावच्या मावशीचाही मृत्यू झाला. आता संदीपच्या घरात सहा वर्षाचा मुलगा, दोन वर्षाची मुलगी, वडील पुंडलीकराव जगताप, भाऊ अनिल व भावजई कांचन जगताप असा परिवार आहे. कोरोनाने या कुटुंबातील चार महिला हिरावून नेल्यानंतर आता जगताप कुटुंब धीराने, संयमाने या विदारक परिस्थितीला सामोरे जाण्याची मनस्थितीत आहे. कोरोनाने एकाच कुटुंबातील चार महिलांचा बळी घेतल्याने ग्रामस्थ हादरले. या कुटुंबाबद्दल मोठी सहानुभूती असल्याचे चित्र बाजारपेठेत असून ग्रामस्थ हळहळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे'; पावसामुळे हानी राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये अन्‌ पंचनामे तीन जिल्ह्यांचेच..

जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून प्राध्यापकाने १९ वर्षीय विद्यार्थिनीवर केला अत्याचार; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्यास भाग पाडलं अन्...

Pune News : पुण्यातील कोंढव्यात एटीएसचे सर्च ऑपरेशन, काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त

Womens World Cup: भारतीय संघाची आजपासून खडतर परीक्षा; महिला विश्‍वकरंडक : आता आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडशी सामने

Latest Marathi News Live Update : मराठा समाजाला 'ओबीसी'मधून आरक्षण द्यायला सकल ओबीसी संघटनांचा विरोध; नागपुरात उद्या मोर्चा

SCROLL FOR NEXT