leopards Spotted in prozone Mall CCTV Footage chhatrapati sambhajinagar  
छत्रपती संभाजीनगर

Leopard Terror : छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्या फिरतोय मोकाट! शाळेला दोन दिवसांची सुट्टी; ९० जण शोधतायत तरी सापडेना

Leopards in Prozone Mall Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरीत सोमवारपासून बिबट्याचा वावर असून वन विभागाने शहरात अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहेत.

रोहित कणसे

छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरीमध्ये तीन दिवसांपूर्वी दिसलेल्या बिबट्यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे आज त्या परिसरात असलेल्या पोदार शाळेला सुटी देण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक पोलिसांच्या ९० जणांच्या टीमकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या याच परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. यानंतर हा बिबट्या शहरातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये आढळून आला आहे. या बिबट्याचा मॉल परिसरातील सीसीटीव्ही व्हिडीओ नुकतेच समोर आला आहे.

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरीत सोमवारपासून बिबट्याचा वावर आहे. वन विभागाने उल्कानगरी, खिवंसरा पार्क व पोदार शाळेजवळ पिंजरे लावले आहेत. नाशिक येथील ४, जुन्नर येथील ११ वनरक्षक कर्मचाऱ्यांसह छत्रपती संभाजीनगर येथील ९० कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहे. बुधवारी वन विभागाने उल्कानगरीपासून ते पैठण रोडवरील बेस्ट प्राइसपर्यंत बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्या असल्याचा कोणताही सुगावा आढळला नाही. झाडाझुडपांत पिंजरा ठेवला असून भक्ष्य म्हणून त्यात शेळी ठेवली आहे. याशिवाय बिबट्याला जाळे लावून पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर

संभाजीनगरमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने उल्कानगरीत पिंजरे लावले आहेत मात्र बिबट्या तिथून तब्बल सहा ते सात किलोमीटर दूर प्रोझोन मॉल बाहेर आढळून आलाय. सीसीटीव्ही मध्ये रात्रीच्या वेळेस हा बिबट्या मॉल बाहेर फिरत असल्याचं दिसले आहे. त्यामुळे उल्कानगरी हा परिसर बिबट्याने कधीच सोडला आहे. मात्र वनविभाग गेली तीन दिवस त्या ठिकाणी 60 ते 70 कर्मचाऱ्यांसह ठाण मांडून बसला आहे. आता बिबट्या जर चिखलठणा भागातील प्रोझोन मॉल जवळ असेल तर वनविभागाचे कर्मचारी इथं काय करत आहेत? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच हा बिबट्या या मॉलच्या परिसरातून नजीकच्या एमआयडीसी भागात गेला असल्याची शंका आता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT