छत्रपती संभाजीनगर

हातपाय थरथरायला लागले...बेवड्यांची गावांकडे धाव 

शेखलाल शेख

औरंगाबाद : वांरवार सांगून, समुपदेशन करुन, उपचार करुन सुद्धा अनेक जण दारु पिणे सोडत नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदीपासून दारुची दुकाने, बार रेस्टारंट बंद झाल्याने बेवड्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. जे दारु पिल्याशिवाय एक दिवस सुद्धा राहु शकत नाही असे अनेक जण तालुका, गावांकडे धाव घेत दारुची शोधाशोध घेत आहे.

यासाठी ते जास्तीचे पैसे मोजून सुद्धा क्वॉटर घेण्यास तयार आहे. मात्र आता बहुतांश गावात अनोळखींना नो एन्ट्री झाल्याने बेवड्यांचे हातपाय थरथरायला लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू झाल्यापासून दारुची सर्व दुकाने बंद करण्यात आली.

रेस्टारंट, धाबे बंद केल्यानंतर ही ग्रामीण भागात अनेकांना सहजपणे दारु मिळत होती. मात्र लोकांनी रस्त्यावर फिरणे, गर्दी कमी न केल्यांने राज्य शासनाकडून ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहिर करुन संचारबंदी करण्यात आली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहिर केल्याने दररोज दारु पिणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. 

चोरटी विक्री, स्टॉक संपला 

सध्या शहरात काही ठिकाणी चढ्या दराने चोरट्या मार्गाने दारु विक्री झाली. आता स्टॉक संपल्याने अनेकांनी ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणी धाव घेत दारु खरेदी केली. अजुन ही अनेक ठिकाणी दारुचा साठा असल्याने आपल्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून दारु खरेदी केली जात आहे. काही जण तर क्वॉटर कुठे मिळते असे विचारतात. आता त्यांना या दुकानांवर सुद्धा दारु मिळत नाही.

हेही वाचा - कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात

अनोळखींना गावात नो एन्ट्री 

कोरोनाच्या बाबतीत जनजागृती झाल्याने जवळपास सर्वच गावांनी अनोळखी व्यक्तांनी नो एन्ट्री केली आहे. गावात येतातच त्यांना कशासाठी आला आहात याची विचारणा केली जात आहे. अनेक जण दारु खरेदीसाठी येत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळत असल्याने त्यांनी आता अनोळखींना येण्यास मज्जाव केल्याने दारुड्यांची चांगलीच फजिती झाली असून आता त्यांना पुढील २० दिवस तरी विनादारुची तरी काढावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT