Voting  Sakal
छत्रपती संभाजीनगर

एकाही पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नाही ओवैसी: उद्धव ठाकरे आता स्वतःला सेक्युलर समजताहेत

आता नव्याने स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही एकही उमेदवार दिला नाही.

सकाळ वृत्तसेवा

‘‘महाराष्ट्रात ४८ लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप आणि अर्धी काँग्रेस, या एकाही पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नाही. आता नव्याने स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही एकही उमेदवार दिला नाही. हे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री व त्यांचा मुलगा मुरब्बी राजकारणी होईल तेव्हा ते मुस्लिमांना विसरून जातील’’, असे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी सोमवारी (ता. सहा) म्हणाले.

अमखास मैदानावर एमआयएमच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘तीस वर्षांपासून इथे एक उमेदवार खान पाहिजे की बाण असा घोषणा करत जातीय वातावरण निर्माण करत जिंकायचा. मात्र, वर्ष २०१९ ला चित्र पालटले आणि जिल्ह्यातील सर्व समाजातील मतदारांनी इम्तियाज जलील यांनी निवडून आणले.

आता चंद्रकांत खैर हे ईदगा, मशीद आणि नमाजापर्यंत पोचले आहेत आणि निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षांत काय होईल याचा विचार करा. जेव्हा संसदेमध्ये यूपीए, ट्रिपल तलाक, एनआरसीचा कायदा तयार होत होता त्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी पाठिंबा दिला आणि हे आता मुस्लिमांच्या हिताची गोष्ट करीत आहे. हा केवळ निवडणुकीचा जुमला आहे.’’ याशिवाय मोदी, शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली.

तुमच्यामुळे आम्हाला दुसऱ्यांची मते नाहीत

‘‘इंडिया आघाडी जेव्हा निर्माण झाली त्यावेळेस अनेक वेळा यांच्या आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, ज्यावेळी सहभागी होण्याची विचार आला त्यावेळेस एका महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी सांगितले, की तुम्हाला सोबत घेतले तर इतर समाजाची आम्हाला मते पडत नाही’’, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT