Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र दिनाबाबत प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस १ मे आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याच दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. त्यामुळे १ मे १९६० पासून दरवर्षी या दिवशी प्रशासनातर्फे ध्वजवंदन केले जाते. राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यात केवळ मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन ठिकाणीच ध्वजवंदन होणार आहे. इतरत्र कुठेही ध्वजवंदन होणार नाही, असे उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्र वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने होईल. हा कार्यक्रम नागरिकांना घरीच वेबकास्टिंगद्वारे पाहावयास मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजवंदन समारंभास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदवले यांचीच उपस्थिती राहणार आहे. तसेच बँड पथक आणि सलामी पथकात पाचपेक्षा कमी पोलिसांची उपस्थिती राहील, असेही श्रीमती मैत्रेवार यांनी सांगितले आहे. 

पालकमंत्री सुभाष देसाई हे महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ध्वजवंदनासाठी गुरुवारी (ता.३०) मुक्कामी येतील. ते गुरुवारी दुपारी १२ वाजता खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतील. त्यानंतर तीन वाजता आढावा बैठक होईल, असेही प्रशासनाने कळवले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

Loni Kalbhor Crime : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांकडून पतीवर केला जीवघेणा हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल

Velhe Crime : निगडेत कोयत्याच्या धाकावर जबरी चोरी; 5 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

SCROLL FOR NEXT